शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तोंडचे पाणी पळवितेय कोण?

By admin | Updated: July 21, 2014 03:53 IST

धरण उशाला कोरड घशाला’ अशी अवस्था पिंपरी-चिंचवडकरांची झाली आहे

विश्वास मोरे, पिंपरी‘धरण उशाला कोरड घशाला’ अशी अवस्था पिंपरी-चिंचवडकरांची झाली आहे. धरण क्षेत्रात आठवडाभरापासून पाऊस पडत असून, मावळातील नदी नाले-वाहू लागल्याने पवनेची पाणी पातळी वाढली आहे. एकीकडे नदीतून अमाप पाणी वाहून जात असताना टंचाईचे कारण पुढे करून दिवसाआड पाण्याचे संकट आणले आहे. शहरवासीयांच्या तोंडचे पाणी नक्की कोण पळवितेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नाबाबत विरोधी पक्ष, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते मूग गिळून का बसलेत? जनतेच्या भावनांशी खेळून पाण्याचे राजकारण करणाऱ्यांनो ‘आता बास!’ म्हणण्याची वेळ आली आहे.‘गाव ते महानगर’ अशी शहराची वाटचाल, वाढ स्तिमित करणारी आहे. राज्यातील सर्वाधिक वेगाने वाढणारे अशीही शहराची ओळख देशात आहे. सन १९६१ ला ३९ हजार ६५४ असलेली लोकसंख्या २०११ मध्ये १७ लाख २९ लाख ३९५ वर पोहोचली आणि २०१४ ला १८ लाखांवर पोहोचली आहे. शहराच्या स्थापनेपासून शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण हा एकमेव जलस्रोत आहे. पाऊस लांबल्याने महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग आणि लोकप्रतिनिधी अशी बैठक होऊन पाणीकपातीचे नियोजन झाले. मात्र, रविवारपासून (दि. १३) मावळातील धरण क्षेत्रात पावसास सुरुवात झाली. धरणातील साठा वाढू लागला, तरी पाणीकपात वाढतच आहे. दिवसाआड आणि आता तर आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करावा लागणार, अशी भीती अधिकारी दाखवीत आहेत. यामागचा राजकीय सूत्रधार कोण, हे शोधण्याची गरज आहे. धरणातून पाणी बंद, तरी पवना तुडुंबधरणातून नदीत दिवसातून ६ तास १२०० क्युसेक पाणी सोडले जाते. पाऊस नसल्याने यात कपात करून १००० क्युसेक पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले. साधारणत: पाऊस सुरू झाला की, धरणातून पाणी सोडणे बंद केले जाते. त्यानुसार ५ दिवसांपासून नदीत पाणी सोडणे बंद केले आहे. कारण धरणाखाली असणाऱ्या ५० गावांमध्ये सध्या संततधार आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील ब्राह्मणोली, वारू, मळवडी, महागाव बंधारा, शिवली, आर्डव, कडधे, करूज, बऊर, ओझर्डे, बेबडओहोळ या डोंगराळ भागातून ही नदी येत असल्याने दिवसाला ५ मिमी पाऊस पडला, तरी नदीतून बाराशे क्सुसेकपेक्षा अधिक पाणी वाहते, असे पाटंबधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.