शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
2
किश्तवाडमध्ये ३-४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले; चकमक सुरु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादांचा शोध सुरु...
3
१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 
4
प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण...
5
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
6
उत्तर कोरियाची नवीकोरी युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली; किम जोंग उन भडकले, सैन्यालाच कारवाईची धमकी दिली
7
"असं वाटलं मृत्यू समोर आलाय", इंडिगो विमानात अडकलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी सांगितली आपबिती
8
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
9
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
10
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
11
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
12
VIDEO : तुफान गारपिटीत सापडले विमान, वैमानिकाने सुखरूप उतरवले; प्रवाशांत प्रचंड घबराट; करु लागले देवाचा धावा
13
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
14
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
15
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
16
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
17
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
18
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
19
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
20
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

गळतीला जबाबदार कोण?

By admin | Updated: March 22, 2016 01:38 IST

पाण्याचा थेंबन् थेंब वाचविण्यासाठी जलसंपदा विभागाने ‘जलजागृती अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाद्वारे पाणीबचतीचे महत्त्व सांगितले जात आहे

पाण्याचा थेंबन् थेंब वाचविण्यासाठी जलसंपदा विभागाने ‘जलजागृती अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाद्वारे पाणीबचतीचे महत्त्व सांगितले जात आहे. मात्र, पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या धरणांच्या कालव्यांची दुरवस्था झाल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे जलजागृती करणाऱ्या जलसंधारण विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. या गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक जलदिनाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने प्रत्यक्ष पाहणी करून मांडलेला लेखाजोखा.जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी चालू अर्थसंकल्पामध्ये चासकमान डाव्या कालव्याची गळती रोखण्यासाठी ९.२३ कोटी रुपये निधी तातडीने मंजूर केला; पंरतु गळती रोखण्यासाठी तो अपुरा पडणार आहे. अस्तरीकरण व लोकांची पाण्याची मागणी यांमध्ये नियोजन केले, तरच एका बाजूची पाणीगळती बंद होईल व दुसऱ्या बाजूची पाणीटंचाई दूर होईल. कालव्याचे अस्तरीकरण पूर्णत्वानंतर चासकमान धरणातील पाणी जुलैअखेरपर्यंत पुरेल व त्यानंतरच जलजागृती अभियान खऱ्या अर्थाने साध्य होईल.जिल्ह्यातील धरणे दुष्काळी भागासाठी वरदान ठरले आहे. यामुळे मोठे क्षेत्र ओलिताखाली आल्याने हरितक्रांती झाली आहे. मात्र या कालव्याच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने लाभक्षेत्रापर्यंत हे पाणी पोहचू शकत नाही. यामुळे ऐन उन्हाळळ्यात या परिसरासाठी पाणी सोडले तरी ते शेवटच्या टोकापर्यंत पोहचू शकत नाही. परिणामी हक्काच्या पाण्यापासून शेतक-यांना वंचित राहावे लागत आहे. परिणामी अनेक ठिकाणच्या शेती जळण्याच्या मार्गावर आहे. > पाणीगळतीमुळे जमिनी झाल्या नापीकचासकमान : एका बाजूला जलसंपदा विभागाचे अधिकारी जलजागृती अभियान राबवीत असताना दुसऱ्या बाजूला चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. सततच्या गळतीमुळे जम्ीिनीही नापीक होण्याच्या मार्गावर आहेत. दर वर्षी गळतीमुळे वाया जाणाऱ्या पाण्यामुळे जलजागृती अभियान नागरिकांसाठी राबिवण्याऐवजी जलसंपदा विभागातील अधिकारी व प्रशासनासाठी राबविणे गरजेचे आहे.चासकमान डाव्या कालव्याला असंख्य ठिकाणी पाणीगळती असल्यामुळे चासकमान धरणातील ४० टक्के पाणी दर वर्षी वाया जाते. खेड तालुक्यातील काही जमीन क्षेत्र या पाणीगळतीमुळे नापीक झाले आहे. तसेच, शिरूर तालुक्यातील शेवटचे क्षेत्र पाण्याअभावी कोरडे राहिले आहे.दर वर्षी चासकमान डाव्या कालव्याला प्रत्येक आवर्तनाचा वेळी साडेपाचशे क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जाते. कालव्याचे अस्तरीकरण रखडल्यामुळे खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन क्षेत्र नापीक होत आहे. तसेच शिरूर तालुक्याचा अखेरचा टोकाला पाणी पोहोचत नसल्यामुळे मोठे क्षेत्र पाण्यापासून वंचित राहते. एका ठेकेदाराऐवजी ४ ते ५ ठेकेदारांमध्ये काही किलोमीटर अंतरानुसार काम वाटून दिले, तर कमी कालावधीमध्ये अस्तरीकरण पूर्ण होईल.> भोर : एकीकडे पाटबंधारे विभागाकडून पाणीबचतीचे जलजागृती अभियान राबविले जात आहे, तर दुसरीकडे भोर तालुक्यातील नीरा-देवघर व वाई तालुक्यातील (जि. सातारा) धोम-बलकवडी या धरणांच्या कालव्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने दोन्ही कालव्यांतून गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. या कालव्यांतील पाणी शेतात जाऊन आजूबाजूची शेती खराब होत आहे. मात्र, याकडे दोन्ही तालुक्यांतील पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष आहे. सध्या दोन्ही धरणांच्या कालव्यांची आर्वतने (पाणी) बंद असल्याने गळतीही बंद आहे.कमी पडणारा पाऊस, धरणात असलेला कमी पाणीसाठा यामुळे जलसंपदा, महसूल, कृषी या विभागांमार्फत जलजागृती अभियान (पाणी बचत) सुरू आहे. मात्र, भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कालव्यातून पाण्याची गळतीने चिखलावडे, भावेखल, सांगवी, भिडे, आंबेघर, शिरवली येथील दोन्ही बाजूची शेतातील पिके खराब होत आहेत. सततच्या पाण्यामुळे अनेक गावांत शेतीच करता येत नाही. धोम बलकवडी धरणाच्या कालव्याचे रावडी, टिटेघर, पळसोशी, नेरे, गोकवडी, जेधेवाडी येथे पाण्याची गळती होत आहे. या गळतीमुळे निळकंठ, जेधेवाडी, गोकवडी येथील शेतकऱ्यांचे शेताचे नुकसान होते. वॉल नादुरुस्त असल्याने पाणी वाया जाते. अस्तरीकणाचे काम निकृष्ट असल्यामुळे कालव्यातून पाण्याची गळती होत असल्याचे रावडी येथील शेतकरी अरविंद जाधव यांनी सांगितले. सध्या नेरे बोगदा ते पाले बोगदापर्यंतच्या व नीरा देवघर धरणाच्या कालव्यातील झाडेझुडपे गवत काढण्याचे काम सुरू आहे. मागील १० वर्षांपासून कालवे अपूर्ण असून, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्याच्या सिमेंट काँक्रिट अस्तरीकरणाचे १० किलोमीटरच्या कामासाठी १२ कोटी रुपये मंजूर असून, पहिल्या दोन किलोमीटरचे काम सुरू आहे. तर धोम बलकवडी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणातून कालव्याला आर्वतन सोडता येत नाही. तर नीरा देवघर धरणातून कालव्याला पाणी सोडलेले नाही. त्यामुळे गळती बंद आहे. राज्यात सतत कमी कमी होणारा पाऊस आणि सर्वच धरणांतील कमी असणारा पाणीसाठा यामुळे शासनाच्या वतीने राज्यभर सर्व शासकीय विभागांमार्फत जलजागृती अभियान राबविले जात आहे. मात्र, जलसंपदा विभागाचे कामकाज पाहिल्यास हे अभियान हे फलकावर आणि कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे.