शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 03:33 IST

महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अभिमानाने जोपासलेल्या बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावावर काही तासांमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/नागपूर : महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा अभिमानाने जोपासलेल्या बडोदा येथे होत असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या नावावर काही तासांमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे. मतदान प्रक्रिया शनिवारी संध्याकाळी ५ वाजता संपली. आज रविवारी दुपारी २ पर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी नवीन संमेलनाध्यक्षाचे नाव जाहीर करण्याची शक्यता असून संमेलनाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागले आहे.आरोप-प्रत्यारोप, एकगठ्ठा मतदान, साहित्य संस्थांनी काढलेले फतवे, आयोजक संस्थेची निर्णायक मते या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा संमेलनाध्यक्ष कोण, याचा फैसला आज होणार आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ८९६ मतपत्रिका पोचल्या होत्या. विदर्भ साहित्य संघातून सर्वाधिक १७५ मतपत्रिका प्राप्त झाल्या, तर मुंबई मराठी साहित्य संघातून केवळ १२२ मतपत्रिका पोहोचल्या होत्या.संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लक्ष्मीकांत देशमुख, राजन खान, रवींद्र शोभणे, किशोर सानप, रवींद्र गुर्जर अशी पंचरंगी लढत होत आहे. दोन उमेदवारांनी विजयाची आशा आधीच सोडून दिली असून, एका उमेदवाराने शेवटच्या टप्प्यात सर्व हालचाली थांबवल्याची चर्चा साहित्यवर्तुळात सुरु आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्षपदाची लढत प्रत्यक्षात दुहेरी झाल्याची चर्चा आहे. आयोजक संस्थेची एकगठ्ठा मते एका विशिष्ट उमेदवारालाच मिळतील हा भ्रम आता दूर झाला असून आयोजक संस्थेच्या मतांचीही विभागणी झाल्याचे समोर आले आहे.मतदानाची ही विभागणी कुणाच्या पथ्यावर पडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत बृहन्महाराष्ट्राच्या मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत विशेष उत्साह आहे. त्यांनी आपला कौल कुणाला दिला, हेही या निकालातून स्पष्ट होणार आहे.दुपारी दोनपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.मतपत्रिका : पूर्वाध्यक्ष ११, महाकोश निधीचे विश्वस्त ८, महाराष्ट्र साहित्य परिषद १५७, विदर्भ साहित्य संघ १७५, मुंबई मराठी साहित्य संघ १२२, मराठवाडा साहित्य परिषद १६७, मराठी साहित्य परिषद तेलंगणा ३१, मध्यप्रदेश साहित्य संघ, भोपाळ ३६, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी ३७, कर्नाटक राज्य मराठी साहित्य संघ, गुलबर्गा ४४, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद छत्तीसगड ३९, मराठी वाङ्मय परिषद बडोदे ८, निमंत्रक संस्था ५७, उमेदवार २. 

टॅग्स :Puneपुणे