शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कुणी शिक्षक देता का शिक्षक?

By admin | Updated: June 26, 2016 04:39 IST

प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. मात्र, या शिक्षणाला अपुऱ्या शिक्षकांच्या संख्येचे ग्रहण

खोर : प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. मात्र, या शिक्षणाला अपुऱ्या शिक्षकांच्या संख्येचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात अनेक शाळांत शिक्षकच नसल्याने ग्रामस्थांवर कुणी शिक्षक देता का शिक्षक, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी डी. एड. झालेल्या स्वयंसेवक तरुणांची मनधरणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थ्यांच्या पटसंख्येबरोबरच शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येचे ग्रहण लागले आहे. यामुळे एका शिक्षकावर अनेक वर्गांत शिकविण्याची जबाबदारी पडली आहे. यामुळे दर्जेदार प्राथमिक शिक्षणापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. दौंड तालुक्यात गेल्या महिन्यात प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये खोरमधील खोर गावठाण, चौधरीवाडी, पाटलाचीवाडी, माने-पिसेवस्ती, डोंबेवाडी, हरिबाचीवाडी, पिंपळाचीवाडी या सर्वच शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या. खोरला ४ शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या, देऊळगावगाडा केंद्रात ६ जागा रिक्त ठेवण्यात आल्या. उन्हाळ्याची सुटी संपून शाळा सुरू होऊन आठवडा झाला. विद्यार्थ्यांचे वाजतगाजत शाळेत स्वागत करण्यात आले. मात्र, शिक्षकच नसल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गावातीलच डी. एड. झालेल्यांना स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी व शिक्षकांना मदत म्हणून कामकाज पाहण्यासाठी विनंती करण्याची वेळ आली आहे. एकीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयएसओ करण्याच्या मोठमोठ्या घोषणा करीत आहेत आणि दुसरीकडे शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता शिक्षक उपलब्ध होत नाहीत, ही खेदाची बाब आहे.जिल्हा परिषदेच्या बेजबाबदार कारभारामुळेच पालक सध्या इंग्लिश मीडियम व माध्यमिक शाळांचा दरवाजा ठोठावत असतानाचे चित्र आहे. शिक्षक भरती होत नसल्याने रिक्त जागेवर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी गावातीलच महिलांना अथवा पुरुषांना ग्रामपंचायत मानधन तत्त्वावर किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दरमहा पैसे देऊन शिकविण्याची वेळ सध्या आली आहे. असे मिळणार मानधन...खोर जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे गावातील २ महिलांना सहायक शिक्षक म्हणून ग्रामस्थांच्या वतीने संधी मिळाली आहे. एका शिक्षिकेचे मानधन ग्रामपंचायत देणार, तर दुसऱ्या शिक्षिकेचे मानधन शाळा व्यवस्थापन समिती देणार.डी .एड.चे शिक्षण आले अंगलटशिक्षकांच्या भरतीच्या स्थगितीमुळे अनेक होतकरू व हातउसने पैसे घेऊन डी.एड.चे शिक्षण पूर्ण केलेली अनेक मुले-मुली सीईटीची परीक्षा केव्हा निघेल व आपण शाळेमध्ये केव्हा रुजू होऊ, याकडे त्यांच्या नजरा आहेत. डी.एड.चे शिक्षण घेऊनही बेरोजगार राहण्याची वेळ आल्याची भावना या तरुणांची झाली आहे. देऊळगावगाडा केंद्रामध्ये खोर गावठाणमध्ये १ जागा, चौधरीवाडी शाळेमध्ये २ जागा, डोंबेवाडी शाळेमध्ये १ जागा, विजयवाडी (कुसेगाव) शाळेला १ जागा, माळीमळा (पडवी) शाळेला १ जागा मिळून केंद्रात तब्बल सहा शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.- महेंद्रकुमार मोरे, केंद्रप्रमुख, देऊळगावगाडा