शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या धामधुमीत आम्हाला वाली कोण?

By admin | Updated: February 21, 2017 02:11 IST

त्यांची ड्युटी प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवसापासून सुरू होते. रात्री अकरा वाजता घरी गेल्यानंतर पुन्हा सकाळी पाच वाजता मतदान

पुणे : त्यांची ड्युटी प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवसापासून सुरू होते. रात्री अकरा वाजता घरी गेल्यानंतर पुन्हा सकाळी पाच वाजता मतदान केंद्रावर हजर राहावे लागते. दिवसभर तहान-भूक हरपून काम करायचे; ना जेवणाची सोय ना निवासाची. स्वत:च डबा करून आणायचा, खायला वेळ मिळाला तर ठीक नाहीतर काम करता करताच कोरडा खाऊ हातावर घेऊन खायचा ही अवस्था आहे मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या शिक्षिकांची. निवडणूकीच्या कामाला जुंपला जाणारा हक्काचा घटक म्हणजे हा शिक्षकवर्ग. लोकशाहीच्या मुलभूत प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या या वर्गाला किमान सोयी-सुविधा पुरविण्याची अपेक्षा असताना याकडे शासनाकडून दुर्लक्षच करण्यात आले आहे. आम्ही सहकाऱ्याची अपेक्षा कुणाकडून करणार? आम्हाला वाली कोण? असा उदविग्न सवाल महिला शिक्षकांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीची रणधुमाळी संपून मंगळवारी (दि. २१) शहरात मतदानाच्या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून शिक्षकांच्या कामाला सुरूवात झाली आहे. मतदानाचे सर्व साहित्य हस्तगत केल्यानंतर ते ज्या मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे, तिथे जाऊन ठेवायचे. ते केंद्र मतदानासाठी सज्ज करायचे. एका केंद्रात किती मतदान होईल त्याचा चार्ट फळ्यावर उतरवायचा. मतदानाच्या अशा विविध कामांमध्ये महिला शिक्षकांचा सोमवारचा दिवस मार्गी लागला. यावेळी एका मतदान केंद्रप्रमुखानेच शिक्षकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा पाढा वाचला. जेवण खाण तर सोडाच पण मतदान केंद्रात साध्या फँनची देखील सोय नाही. त्यामुळेच आम्हीच स्वखर्चाने पुढाकार घेऊन थर्मासमध्ये चहा उपलब्ध करून देणे, फँन्स लावणे या गोष्टी शिक्षकांना पुरविल्या आहेत. एखाद्या शाळेत किंवा महाविद्यालयातील मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांनी तरी मुलभूत सोयीसुविधा देण्यासंबंधी विचार करायला काय हरकत आहे? लोकशाही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोठे असते, मात्र तेच दुर्लक्षित राहात आहेत, याकडे लक्ष वेधले. सकाळीच निघताना बरोबर डबा आणल्यामुळे किमान सोमवारचा त्यांचा दिवस तरी सत्कारणी लागला. मात्र मतदानाच्या दिवशी तरी किमान शासन किंवा लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांच्या मुलभूत सोयी-सुविधांचा विचार केला जावा अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आली. जेवण-चहा याबरोबरच महिलांना रात्रीच्या वेळेस जाण्याची बससुविधा मिळायला हव्यात, मात्र या मागण्या महिलांच्या वतीने पुरूषमंडळींकडूनच मांडले जात होते. आपल्या अडचणी सांगितल्या तर नोकरीवर गडांतर येईल की काय अशी भिती महिलांना वाटत होती.