शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

पांढरी काठी आजही अंधारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2015 00:24 IST

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल होत असली, तरीही अंध बांधवांची पांढरी काठी मात्र आजही अंधारातच वाट शोधत आहे.

पराग कुंकूलोळ, चिंचवडआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एकविसाव्या शतकाकडे वाटचाल होत असली, तरीही अंध बांधवांची पांढरी काठी मात्र आजही अंधारातच वाट शोधत आहे. पारंपरिक शिक्षणपद्धती, रोजगार व विवाह समस्यांमुळे हे बांधव आजही दारोदार भटकंती करत असल्याचे वास्तव राज्यात दिसत आहे. यांच्या काठीला सहकार्याची नितांत गरज असल्याचे मत अंध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींकडून व्यक्त होत आहे.राज्यात अनुदानित ५६ आणि विनाअनुदानित १४ अशा ७० शिक्षण संस्थांच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना १ली ते ७वीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. १७ अनुदानित व ९ विनाअनुदानित व्यवसाय प्रशिक्षण केंद्रांतून रोजगारासंदर्भात शिक्षण देणे सुरू आहे. मात्र, या शिक्षणपद्धतीतून पारंपरिक धडे देण्याचे काम सुरू आहे. झाड़ू, मेणबत्ती, अगरबत्ती, खुर्च्यांचे विणकाम अशा प्रशिक्षणातून शिक्षण दिले जाते. यातून हे अंध बांधव सक्षम होतात का, हा महत्त्वाचा विषय आहे. काही संस्था आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्या, तरीही शासनाच्या उदासीन धोरणामुळे त्यांचे पुनर्वसन होत नसल्याची खंत अंध शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.दुसऱ्या महायुद्धात अनेक जवानांना व नागरिकांना अंधत्व आले. त्यावर मात करण्यासाठी अमेरिकेतील आर्मीच्या ‘व्हॉली फोर्स’मध्ये अंध जवानांना काठीच्या साहाय्याने चालण्याचे शिक्षण देणे सुरू झाले. परंतु, वापरण्यात येणारी काठी लांब व वजनाने जड होती. १९४४मध्ये रिचर्ड हूवर यांनी पांढऱ्या काठीचा शोध लावला. हलकी व घडी घालून ठेवता येणारी काठी तयार करून त्यांनी अंधांना दिलासा दिला. ही काठी भारतातील अंधांच्या हातात यायला कित्येक वर्षे लागली. डेहराडून येथे १९७१मध्ये या काठी वापरण्याचे धडे देणारे पहिले प्रशिक्षण केंद्र स्थापन झाले. शाळांमध्ये शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आले. उपयुक्त ठरत असल्याने ही काठी भारतात बनविण्यास सुरुवात केली. मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, बंगलोरमध्ये ही काठी बनिवणाऱ्या कंपन्या आहेत.राज्यातील अंध विद्यार्थ्यांना शिक्षण साचेबंद पद्धतीने दिले जात आहे. या घटकाचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन करायचे असल्यास शासनाच्या धोरणात्मक निर्णयात बदल होणे अपेक्षित आहे. शिक्षणप्रणाली व व्यावसायिक प्रशिक्षण आधुनिक पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे. पुनर्वसनाकरिता शासकीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींची समिती स्थापन करावी. अंध-अपंगांच्या विकासासाठी घटनात्मक बदल करण्यास लढाई करावी लागेल. योजना तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणारी यंत्रणा सक्षम झाल्यास अंध बांधव स्वावलंबी होतील. - विकास पोतदार, महाराष्ट्र राज्य अपंग शाळाचालक समितीचे उपाध्यक्ष