शुक्रवारी रात्री शहरात अनेक ठिकाणी धुके पडले होते. त्यात ढगाळ हवामान होते. त्यात थंड वारे वाहत असल्याने एकाचवेळी थंडी जाणवत होती. तर ढगाळ आकाशामुळे आर्द्रता वाढल्याने उकाडा जाणवत होता. कधीही पाऊस पडले, असे जाणवत होते. त्यामुळे दिवसाचे कमाल तापमान आज अचानक घसरले. सायंकाळी शहरात कमाल तापमान २५.३ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. ते सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सिअसने कमी आहे. किमान तापमानात वाढ तर कमाल तापमानात घट असा विचित्र अनुभव पुणेकरांना आज आला.
रविवारी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून कमाल व किमान तापमान अनुक्रमे २८ व १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.