शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर येथे भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला बिबट्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 16:37 IST

बेल्हा (ता.जुन्नर) येथील यादववाडी परिसरात भक्ष्याचे पाठलाग करताना सहा वर्ष वयाचा बिबट्या विहिरीत पडला.

ठळक मुद्देसहा ते सात तास बिबट्या पाण्यातच

बेल्हा : बेल्हा(ता.जुन्नर) येथील यादववाडी परिसरात भक्ष्याचे पाठलाग करताना सहा वर्ष वयाचा बिबट्या विहिरीत पडला. ग्रामस्थ,पोलीस व वनखात्याच्या कर्मचा-यांनी विहिरीत पिंजरा सोडुन बिबट्या पिंज-यात अलगत अडकला.    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादववाडी येथे देवराम पिंगट यांची विहिर आहे. शुक्रवारी (दि. ५ आॅक्टो) पहाटेच्या सुमारास वंदना पिंगट या विहिरीजवळ मोटार चालु करण्यासाठी आल्या असताना त्यांना विहिरीतुन आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावुन पाहिले असता बिबट्या मोटारीच्या पाईपाला धरुन बसलेला पाहिला. त्यांनी घरी जावुन सांगितले असता घरच्यांनीही खात्री केल्यावर त्यांना बिबट्या दिसला.त्यांनी ताबडतोब वनखात्याच्या कर्मचा-यांना ही माहिती दिली. वनखात्याच्या कर्मचा-यांनी या ठिकाणी येवुन खात्री केली.या ठिकाणी कुत्र्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला होता.या विहिरीत एक कुत्रेही मेलेले दिसत होते. वनखात्याच्या कर्मचा-यांनी सर्व प्रथम या पाण्यात पडलेल्या बिबट्यासाठी एका जाडीला चारी बाजुने दोर बांधले. त्यानंतर माणिकडोह येथुन पिंजरा आणण्यात आला. त्यानंतर त्या पिंज-याला चारी बाजुने दोर बांधुन पिंजरा पाण्यात जाडीजवळ सोडला.त्यानंतर लगेचच तो बिबट्या अलगतपणे पिंज-यात अडकला. सहा ते सात तास बिबट्या पाण्यातच होता.तो खुपच थकलेला दिसत होता.मात्र पिंज-यात अडकल्यानंतर तो बिबट्या लोकांवर गुरगुरत होता.हा बिबट्या मादी जातीचा असुन सहा वर्ष वयाचा आहे. बिबट्या पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.या बिबट्याला माणिकडोह येथे हलविण्यात आले आहे.याठिकाणी वनकर्मचारी डी.डी.फापाळे, जे.टी.भंडलकर,बी.एस.शेळके,पोलीस पाटील बाळकृष्ण शिरतर,पोलीस व डॉ.ढोरे यांचे विशेष पथकाने विशेष सहकार्य केले.

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्या