शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवाने मंजुरीसाठी लाच घेताना पालिकेच्या एजंटला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 23:21 IST

पुणे : बांधकाम परवानगी व नकाशे मंजूर करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक ...

पुणे : बांधकाम परवानगी व नकाशे मंजूर करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी ३० हजार रुपये स्वीकारणाऱ्या एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सापळा रचून पकडले. सुवेद शिवराम दुडये (वय ३२, रा. गंगाधाम, गोकुळनगर, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. बिबवेवाडीतील ढेरे असोसिएटस येथे तो कामाला आहे.याबाबतची माहिती अशी, महापालिकेचे अधिकारी बांधकाम परवानग्या व नकाशे मंजूर करण्यासाठी स्वत: लाच न स्वीकारताना एजंटामार्फत पैसे घेत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती. तक्रारदार यांचे कोंढव्यातील टिळेकरनगर येथील जागेवर बांधकाम परवानगी व नकाशा मंजूर करण्यासाठी त्यांनी ढेरे असोशिएसमध्ये नोकरी असणारे सुवेद दुडये यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर केली होती.दुडये यांनी मंजुरीसाठी महापालिका अधिकाऱ्यांना ३० हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, असे सांगितले. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी केल्यावर दुडये हे महापालिका अधिकाऱ्यांसाठीच लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी ढेरे असोसिएटस येथे उपअधीक्षक दत्तात्रय भापकर, कांचन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ३० हजार रुपये स्वीकारताना दुडये याला पकडण्यात आले.