शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आता कोणता मार्ग सुरक्षित?

By admin | Updated: February 6, 2015 23:39 IST

जगभरात रस्ते तसेच रेल्वे अपघातांच्या तुलनेत विमान अपघातांचे प्रमाण कमी असले तरी, रस्ते अपघातात जितके बळी जातात,

जगभरात रस्ते तसेच रेल्वे अपघातांच्या तुलनेत विमान अपघातांचे प्रमाण कमी असले तरी, रस्ते अपघातात जितके बळी जातात, त्यापेक्षाही जास्त बळी विमान अपघातात जात असल्याचे चित्र आहे़ समुद्रात जहाज बुडण्याच्या घटनाही लक्षणीय आहेत़ वर्षाला साधारणपणे १८ ते २० विमान अपघात होत असल्याचे आतापर्यंच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ मात्र, यातील बळींची संख्या लक्षणीय आहे़ रस्ते, रेल्वेप्रमाणेच आता विमान प्रवासही सुरक्षित राहिला नसल्याचे अलिकडच्या मलेशियासह तैवानमधील विमान अपघातांवरुन दिसून येते़एकेकाळी जगभरात विमान प्रवास हा तुलनेने सुरक्षित मानला जात असे़ म्हणूनच या प्रवासाला अनेकांचे प्राधान्य असे़ मात्र विमान प्रवास हा केवळ उच्चवर्गीयांसाठीच असे चित्र होते़ पण आता हे चित्र बदलले आहे. या क्षेत्रातील अनेक कपंन्याच्या प्रवेशामुळे स्पर्धा निर्माण होऊन विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे़ कमी वेळेत नियोजितस्थळी सुरक्षितपणे पोहोचणे हे विमान प्रवासामुळे साध्य होऊ शकले आहे़ मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानातील काही बाबी धोक्याच्या ठरत असल्याचे जगभरातील अनेक घटनांवरुन स्पष्ट होते़ बहुतांश विमान अपघातांत हेच कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे़ गतवर्षी क्वालालम्पूरहून बीजिंगला जाणारे मलेशियाचे विमान अचानक बेपत्ता झाले़ या विमानात २२७ प्रवासी आणि १२ क र्मचारी होते़ महासत्ता असलेल्या अमेरिकेसह चीनलाही या विमानाचा शोध लावता आलेला नाही. महासागराचा तळ गाठण्यात आला, उपग्रहाद्वारेही शोध घेण्यात आला. मात्र, या विमानाचे गूढ काही केल्या उकलता आले नाही. यातून महासत्तेच्या सामर्थ्यासह तंत्रज्ञान व विज्ञानाच्या प्रगतीच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. याच कंपनीचे आणखी एक प्रवासी विमान युक्रेनमध्ये कोसळून २८३ प्रवासी व १५ क र्मचारी ठार झाले होते. आता बुधवारी तैवानची राजधानी तैपेई येथे ट्रान्सएशिया एअरवेजचे जीई-२३५ विमान किलुंग नदीमध्ये कोसळले. यामध्ये १९ प्रवासी ठार झाले़ काही प्रवाशांना सुखरुप पाण्याबाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले, तर २४ जण बेपत्ता आहेत. वैमानिकाने संकेत दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि उड्डाणानंतर काही क्षणांतच दुर्घटना घडली, हे विशेष! या घटनांच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवासही आता सुरक्षित राहिला नसल्याचे दिसून येते़ १४ फेब्रुवारी १९९० बंगळुरु विमानतळावर इंडियन एअरलाईन्सचे ६०५ आणि एअर बस ए ३२० यांच्यात झालेल्या अपघातात ९२ प्रवाशांचा मृत्यू झाला होता़ या विमानांमध्ये एकूण १४६ प्रवासी होते़ २० जानेवारी १९९२फ्रान्समध्ये वॉसगेसमध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात ८७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता़ या विमानात ९६ प्रवासी होते़ ३१ जुलै १९९२थायलंड एअरवेजचे एअरबस ए ३१० हे विमान नेपाळच्या काठामंडूमध्ये कोसळून १४ कर्मचाऱ्यांसह ९९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता़ तर सप्टेंबरमध्ये येथेच पाकिस्तानचे एक विमान कोसळून १२ कर्मचाऱ्यांसह १५५ प्रवाशांचा बळी गेला होता़८ फेब्रुवारी १९९३ इराणचे प्रवासी वाहतूक करणारे विमान आणि इराणच्या हवाईदलाचे सुखोई एसयू -२४ या विमानांची तेहरानमध्ये हवतेच टक्कर होऊन झालेल्या अपघातात १३३ जणांचा मृत्यू झाला होता़२६ एप्रिल १९९४जपानच्या नगोया येथे लॅण्डिग करताना वैमानिकाच्या चुकीमुळे चीनच्या विमानाला अपघात होऊन २६४ प्रवाशांचा मृत्यू झाला़ या विमानात एकूण २७१ प्रवासी होते़८ सप्टेंबर १९९४अमेरिकेतील पीटस्बर्ग आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवर उतरताना झालेल्या अपघातात १३३ जणांचा बळी गेला़ ६ फेब्रुवारी १९९६डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच प्यूर्टो प्लाटा येथे समुद्रात कोसळून १८९ प्रवाशांचा मृत्यू झाला़२६ सप्टेंबर १९९७बहुआ नाबर या इंडोनेशियातील शहरातील डोंंगरावर गरुडा इंडोनेशियाचे विमान कोसळून २३४ जणांचा मृत्यू झाला़ ३ जानेवारी २००४अफ्रिका आणि आशिया खंडातील मधोमध तांबड्या समुद्रात बोर्इंग ७३७-३०० हे विमान कोसळून १३५ प्रवाशांचा मृत्यू झाला़ आतापर्यंतच्या विमान अपघातांत हा अपघात सर्वाधिक भीषण असल्याचे बोलले जाते़ ९ जुलै २००६ रशियाच्या इकृत्सक आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिमेंट काँक्रिटच्या बॅरिकेडस्ला विमान धडकून २०३ पैकी १२८ जणांचा मृ्त्यू झाला़ १७ जुलै २००७ब्राझिलच्या साओ पावेलो विमानतळावरच टीएएम एअरलाईन्सच्या ३०५४ या विमानाला अपघात होऊन १८७ प्रवाशांचा मृत्यू झाला़ २२ मे २०१०मंगळुरु येथे इंडियन एअर लाईन्सच्या विमानाला धावपट्टीवर उतरताना भीषण अपघात होऊन १६० प्रवासी आणि ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता़ २० एप्रिल २०१२पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये खराब हवामानामुळे विमान अपघात होऊन १२७ प्रवाशांचा मृत्यू झाला़ १७ जुलै २०१४अ‍ॅमस्टरडॅमहून क्वालांपूरकडे जाणाऱ्या मलेशियाच्या विमानाला युक्रेनमध्ये अपघात होऊन २८३ प्रवासी आणि १५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला़राजेश भिसे