शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

कुटुंबासह जायचे कुठे?; कारवाईविरोधात स्थानिकांमध्ये रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 03:35 IST

शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या जागेतील घरे व दुकानांवर कारवाई करण्याच्या निर्णयाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या जागेतील घरे व दुकानांवर कारवाई करण्याच्या निर्णयाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. या कारवाईविरोधात तेथील नागरिकांमध्ये रोष वाढू लागला आहे. अन्यत्र कमी भाडे देऊन घर मिळत नाही. मुलांच्या शाळा, छोटे-छोटे व्यवसाय, मुजरीची कामे सोडून कुटुंबासह जायचे कुठे? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.शिवाजीनगर रेल्वेस्थानक परिसरातील १५९ घरे व २७ दुकाने रिकामी करून सोडण्याची नोटीस रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई १५ ते २२ डिसेंबर या कालावधीत केले जाणार आहे. याबाबतच्या नोटिसा सर्व रहिवाशांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी हतबल झाले आहेत. अनेक जण वर्षानुवर्षे या जागेवर राहत आहेत. अनेकांचे छोटे व्यवसाय, दुकानेही याच परिसरात आहेत. मजुरी, घरकाम करणारे अनेक जण आहे. त्यावरच संसाराचा गाडा हाकला जातो. मुलांच्या शाळाही याच परिसरात आहेत. त्यामुळे अचानक सर्व सोडून इतरत्र राहायची व्यवस्था कशी होणार? व्यवसाय, मुलांच्या शाळा बंद पडतील. त्यामुळे इथेच राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत.नागरिकांनी मांडली आमदारांसमोर व्यथाआमदार अनिल भोसले यांनी दुपारी परिसरातील नागरिकांची भेट घेतली. नागरिकांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. नवीन नियमाप्रमाणे झोपडट्टीवासीयांना आहे तिथेच, त्याच जागी घर देणे आवश्यक आहे. यापूर्वी आम्ही झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी औंधमध्ये घर देण्याची मागणी केली होती. पण ती मागणी त्यावेळेस फेटाळली गेली. आता या रहिवाशांना आहे त्या ठिकाणीच घर पाहिजे, असे भोसले यांनी सांगितले.अनेक वर्षांपासून येथेच राहतोय. आता अचानक घर खाली करावे लागले तर कोठे जायचे, हा प्रश्न पडलाय. दुसरीकडे गेल्यावर परत कामाचा प्रश्न. स्थानकाबाहेरच माझा व्यवसाय आहे.- अनिल मोरे, रहिवासीआठ दिवसांपासून घर शोधतोय, पण घर मिळत नाही. दुसरीकडे गेलो तर आताच काम पण जाईल मग पुन्हा नवीन काम शोधावे लागेल. शासनाने आम्हाला पाच महिन्यांची मुदत द्यावी. मे महिन्यात मुलांच्या परीक्षा होईपर्यंत तरी आम्हाला येथे राहू द्यावे.- अर्चना कोळी, रहिवासीमाझी एक मुलगी बारावीला आणि दुसरी पदवीचे शिक्षण घेतेय. इथून गेलो तर त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. हडपसरला यांनी घरे दिली पण काही कारणांमुळे ती विकावी लागली. पोलीस बंदोबस्तात घर पडणार आहेत. आधी आमच्यावरूनच बुलडोझर घाला म्हणजे आमचे प्रश्न तरी संपतील.- मंगल बकरे, रहिवासी

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण