शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

काम पूर्ण केले नाही तर पैसे गेले कोठे? फ्लॅटधारकांचा डीएसकेंना सवाल; फायनान्स कंपनीकडून कायदेशीर नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:03 IST

फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी २००हून अधिक फ्लॅटधारकांनी शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी केली होती.

पुणे : फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी २००हून अधिक फ्लॅटधारकांनी शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी केली होती़ डीएसके यांनी आमच्या इमारतीचे काम पूर्ण केले नाही, तर ते पैसे गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत़ दरम्यान, डीएसके यांच्याकडे फ्लॅट घेताना कर्ज घेतलेल्यांना टाटा फायनान्स कॅपिटल हाउसिंग फायनान्स कंपनीने कायदेशीर नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे़आनंदघन या प्रकल्पात ४५० फ्लॅट असून त्याचा ताबा डिसेंबर २०१६ मध्ये देणार होते. पण मुदत उलटून एक वर्षानंतरही ताबा मिळालेला नाही. इमारतीचे काम अजूनही अपूर्ण आहे. आश्वासन दिल्याप्रमाणे पुन्हा कामास सुरुवातही केलेली नाही. कधीपर्यंत ताबा देणार, हेही सांगत नसल्याने तक्रार देण्याचा निर्णय फ्लॅटधारकांनी घेतला. प्रकल्पातील फ्लॅटधारकांनी तक्रारी दिल्या आहेत.पोलिसांनी स्वतंत्र फॉर्मच तयार केला आहे़ डीएसके यांच्या तीन प्रकारच्या स्कीम आहेत़ त्यात वैयक्तिक कर्ज घेऊन खरेदी केलेला फ्लॅट, अन्य फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन घेतलेला फ्लॅट आणि आधी घर, पैसे नंतर या स्कीमनुसार तक्रारी घेतल्या जात आहेत.ना घर का ना घाटकाडीएसके यांच्या ‘आधी घर पैसे नंतर’ या योजनेनुसार फ्लॅट बुक केलेल्यांना डिसेंबर २०१६मध्ये ताबा मिळणार होता़ त्यानंतर कर्जाचा मासिक हप्ता सुरू होणार होता़ तोपर्यंतचा हप्ता डीएसके भरणार होते़ त्यांनी तो न भरल्याने फायनान्स कंपन्यांनी फ्लॅटधारकांच्या खात्याला अ‍ॅटॅचमेंट लावली आहे़ त्यांनी आगाऊ दिलेले धनादेश बँकेत भरले़ते न वटल्याने त्यांना आता कायदेशीर नोटिसा येऊ लागल्या आहेत़ त्यांच्या खात्यातून चेक न वटता परत गेल्याने ते डिफॉल्टर ठरल्याने त्यांचे क्रेडिट रेटिंग कमी झाले आहे़ आता त्यांना दुसºया कोणत्याही कामासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते त्यासाठी अपात्र ठरू लागले आहेत़

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णी