शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसाराचा निधी गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 18:18 IST

महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला. या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देशातून राज्य सरकारने १२ आॅगस्ट २०१४ रोजी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीची स्थापना केली.

ठळक मुद्देनिधीच्या माहितीपासून समिती अनभिज्ञमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समितीला दरवर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्याची ग्वाही

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांपासून केलेली निधीची तरतूदच केवळ कागदावरच उरली आहे. प्रत्यक्षात या निधीचा विनियोग केल्या नसल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला. तत्कालीन सरकारने कार्यालयीन कामकाजामधून एक कोटी रुपयांची तरतूद केली होती. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर कायद्याची प्रक्रिया सुरू असताना दरवर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र, या निधीचे पुढे काय झाले, याबद्दल सरकारने जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीला कोणतीही माहिती दिलेली नाही. महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०१३ मध्ये जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला. या कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा उद्देशातून राज्य सरकारने १२ आॅगस्ट २०१४ रोजी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीची स्थापना केली. सामाजिक न्याय विभागामार्फत या कायद्याचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी २०१४-१५ या वर्षात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक याप्रमाणे ३५ जाहीर सभा, तीन कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे, पोलीस अधिका-यांच्या ४० कार्यशाळा आणि चारशेहून अधिक शाळा-महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आले. त्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती.  राज्यातील सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समितीला दरवर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार गृह खात्याकडून करण्यात आलेली तरतूद सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाले असले तरी त्याच्या खर्चाबाबत विभागाने समितीला माहिती दिलेली नाही. कायद्याची प्रक्रिया सुरू असताना दरवर्षी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्याचे ठरले होते. मात्र, हा निधी मिळाला की नाही आणि मिळाला असेल तर त्यातील किती खर्च झाला याबद्दल सहअध्यक्ष असूनही मी अनभिज्ञ आहे, असे श्याम मानव यांनी सांगितले. या कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी मी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत प्रयत्न करतो. पण, त्या कामाला काही प्रमाणात मर्यादा पडतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.------------समितीचे कार्यालय पुण्यात सुरु झाले आणि यंत्रणाही उभारण्यात आली. नव्या सरकारच्या काळात हे काम ठप्प झाले. २०१५ पासून ३५ जिल्ह्यात ४० पोलीस प्रशिक्षण, जाहीर सभा, वक्तयांचे प्रशिक्षण पार पडले. त्यावेळी प्रवास खर्चापासून सर्व खर्चासाठी मी पदरमोड केली होती. तो खर्च मला अद्याप शासनाकडून मिळालेला नाही. तीन कोटी रुपये नियमाप्रमाणे गृह खात्याकडून सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाले असावेत. मात्र, या रकमेचे काय केले, किती खर्च झाला याबद्दल सहअध्यक्ष असूनही मी अनभिज्ञ आहे.  - प्रा. श्याम मानव,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-संघटक  

टॅग्स :Puneपुणेshyam manavश्याम मानवDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार