शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

पूररेषा केव्हा होणार निश्चित ? साईनाथनगरच्या चारशे कुटुंबांना चार वेळा बसला पुराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2019 12:57 IST

साईनाथनगरची अद्यापही पूररेषा प्रशासनाने निश्चित न केल्यामुळे वर्षानुवर्षे साईनाथनगरमध्ये बांधकामे होत आहेत.

ठळक मुद्देसाईनाथनगरच्या ४०० कुटुंबांचे अपरिमित नुकसान

चंदननगर : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुळा-मुठा नदीला पूर आला. त्यात वडगावशेरी-खराडी नदीकाठी असणाºया साईनाथनगरच्या चारशे कुटुंबांना याचा फटका बसला व कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले. मूळ मुद्दा असा आहे, साईनाथनगरची अद्यापही पूररेषा प्रशासनाने निश्चित न केल्यामुळे वर्षानुवर्षे साईनाथनगरमध्ये बांधकामे होत आहेत. जर प्रशासनाने वेळीच साईनाथनगरची पूररेषा निश्चित केली असती तर बांधकामे झाली नसती व पर्यायाने सर्वसामान्य गरिबांना पुराचा फटका बसला नसता. प्रत्येक वेळी येणाऱ्या पुरातून होणाऱ्या नुकसानाचे प्रशासनाकडून पुराचे पंचनामे केले जातात. मात्र, महत्वाचा मुद्दा  म्हणजे या परिसराला नेहमी पुराचा मोठा फटका बसत आला आहे. सातत्याने पुराचा फटका बसत असल्यामुळे येथील सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र यासाठी महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. यापूर्वी चार वेळा साईनाथनगरला पुराचा फटका प्रचंड बसला आहे. सर्वात जास्त फटका या वर्षी म्हणजे (गेल्या पंधरा) दिवसांपूर्वी आलेल्या पुराने बसला आहे.  या पुरात घरातील सर्व साहित्य, वापराचे साहित्य धान्य कचऱ्यात टाकण्याची वेळ साईनाथनगरच्या पूरग्रस्तांवर आली. याबाबत ‘लोकमत’ने साईनाथनगरची  प्रत्यक्ष पाहणी केली असता नदीपात्रात प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. यास महापालिका प्रशासन जबाबदार आहे. वेळीच जर साईनाथनगरची पूररेषा निश्चित केली असती तर निश्चितच बांधकामे  झाली नसती व त्याचा फटका गोरगरिबांना बसला नसता, असे पाहणीत समोर आले.  यापूर्वी साईनाथनगरला १९९४ मध्ये पूर आला होता. मात्र त्यावेळी नदीपात्रालगत बांधकामे झाली नव्हती. त्यानंतर मुळा-मुठा नदी वहन क्षमता एक लाख  क्युसेक असणे धरले आहे. यानंतर १९९७ मध्ये खडकवासला धरणातून  ९0 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यात साईनाथनगरच्या वीस घरांत पुराचे पाणी घुसले होते. यानंतर २00५ मध्येही पूर आला होता. या वेळी १२५ घरांत पुराचे पाणी घुसले होते. त्यानंतर २0१४ मध्ये पूर आला होता . त्यावेळी १00 घरात पाणी घुसले होते. यावर्षी नदीपात्रालगत बांधकामे प्रचंड वाढल्यामुळे यावर्षी पंधरा दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून ४७  ते ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला व  चारशे घरांत पुराचे पाणी घुसले.

टॅग्स :Chandan NagarचंदननगरfloodपूरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका