चंदननगर : खराडी-वडगावशेरी-विमाननगर-चंदननगर या परिसरातील रस्ता, ड्रेनेज, पथदिवे, पाणी, कचरा, आरोग्य, जमिनी अंतर्गत हायटेन्शन विद्युत वाहिन्या, मुस्लिम दफनभूमी, पावसाळी गटार स्वच्छता, खेळांचे मैदान , वाहतूककोंडी, वाढलेल्या झाडांचा विस्तार कमी करावा, ओला-सुका कचरा रस्त्यावर ठिग साचतात, रोडरोमियोंवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्यांसह महापौरांना नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती करुन अगदी काही काळासाठी भंडावून सोडले.महापौर आपल्या दारी हा उपक्रम खराडीतील चंदननगरमधील एनआय बसस्टॉप येथील मनपाच्या बहुउद्देशीय कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी नागरिकांनी महापौरांवर अक्षरक्ष: प्रश्नांचा भडिमारच केला. चंदननगर-वडगावशेरीमधील भाजी मंडई त्वरीत सुरू कराव्यात अशा विविध प्रश्न जाणुन घेऊन महापौर मुक्ता टिळक व स्थायीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सर्व प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना केल्या. महापौर मुक्ता टिळक, स्थायाची अध्यक्ष योगेश मुळीक,प्रभाग समिती अध्यक्षा श्वेता गलांडे, नगरसेविका सुमन पठारे, नगरसेवक भैय्या जाधव, सुनिता गलांडे, बापु कर्णे गुरूजी, नगररस्ता क्षेत्रीय अधिकारी सुनिल गायकवाड, आरोग्य, बांधकाम विभागासह सर्व महापालिका विभागातील विविध खात्यांचे अधिकारी यांनी उपस्थित राहुन नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले.ज्येष्ठांनी दिला नगरसेवकांना सज्जड दम...प्रभाग क्रमांक ३ मधील नगरसेवक बाबुराव कर्णे गुरूजी, नगरसेविका प्रभाग समिती अध्यक्षा श्वेता गलांडे यांना ज्येष्ठ नागरिकांनी दररोज कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्या येत नसल्याने हा मुद्दा गंभीर असुन उपस्थित करत दोन्ही नगरसेवकांना चांगलेच धारेवर धरले. तुम्ही नगरसेवक आहात मालक नाही, तुम्हाला जनतेची सेवा करण्यासाठी निवडुन दिल्याचेही ठणकावून सांगितले.लहान मुले घुसली मध्येच...महापौर व नागरिक यांच्यात प्रश्न उत्तरे सुरू असताना अचानक पाच ते सहा मुलांनी माईकचा ताबा घेत आम्हाला शाळेला सुट्टया लागल्या आहेत. परंतु, आम्हाला खेळण्यासाठी क्रिडांगण नाही ते खेळण्यासाठी मैदान उभारावे, अशी मागणी करताच महापौर यांनीही आम्ही तुमच्यासाठी खेळाचे मैदान उभारू, असे आश्वासन चिमुकल्यांना दिले.
महापौरांवर जेव्हा केली जाते नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 21:20 IST
महापौर आपल्या दारी हा उपक्रम खराडीतील चंदननगरमधील एनआय बसस्टॉप येथील मनपाच्या बहुउद्देशीय कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
महापौरांवर जेव्हा केली जाते नागरिकांकडून प्रश्नांची सरबत्ती
ठळक मुद्देसर्व प्रश्न तातडीने सोडविण्याच्या अधिकाऱ्यांना सुचनाज्येष्ठांनी दिला नगरसेवकांना सज्जड दम...