शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

चाकण बाजारात भाज्या मातीमोल; पावसामुळे शेपू व कोथिंबिरीचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:37 IST

बाजारात भाज्यांचे ढीग पडून, भाज्या फेकून दिल्या

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केट यार्डमधील तरकारी बाजारात पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. पावसामुळे पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेपू, मेथी, पालक व कोथिंबिरीचे भाव गडगडल्याने बाजारात भाज्यांचे ढीग पडून होते. अक्षरश: भाज्या मातीमोल झाल्या.मेथी, शेपू, कोथिंबीर भाज्या एक ते दोन रुपयाला दोन-दोन गड्ड्या मिळत होत्या. ५० पैसे व एक-दोन रुपये भाव मिळाल्याने कोथिंबिरीचे ढीग बाजारातच सोडून दिले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. पावसामुळे बाजारात पालेभाज्या व कोथिंबिरीला उठाव नव्हता. पावसाने कोथिंबिरी व पालेभाज्या भिजून खराब झाल्या असून बाजारात सोडून दिलेल्या भाज्यांच्या ढिगावर अक्षरश: जनावरांनी ताव मारला.तरकारी बाजारात कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, बिन्सचे भाव कोसळल्याने याही भाज्या बाजारात सोडून दिल्या. या फळभाज्यांना २ ते ५ रुपये इतका कमी भाव मिळाल्याने या फळभाज्या शिल्लक राहिल्या. शिल्लक राहिलेल्या परंतु चांगल्या प्रतवारीच्या भाज्या अडत्यांनी उद्याच्या विक्रीसाठी झाकून ठेवल्या आहेत.

टॅग्स :Chakanचाकणvegetableभाज्याMarketबाजार