गहू पिकास साधारणत सात ते आठ पाण्याची आवर्तन लागतात. चालू वर्षी समाधानकारक पावसामुळे या पिकासाठी पाण्याचा प्रश्न संपुष्टात आल्याने पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सध्या अचानकपणे निर्माण झालेले रात्रीचे थंड वातावरण हे फुलोरा अवस्थेत असलेल्या गहू पिकास फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे लोबींचा आकार व दाण्याचे वजन वाढून उत्पादनात वाढ होणार आहे, अशी माहिती गहू उत्पादक शेतकरी विजयसिंह कानगुडे (शेटफळ हवेली) यांनी दिली. चालू रब्बी हंगामात अनेक शेतक-यांनी गव्हाचे पीक हे ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून घेतले आहे. ऊस पीक तुटल्यानंतर गव्हाचे अनेक पीक शेतकऱ्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत, सध्या पीकपाण्याची स्थिती चांगली असल्याने शेतकरी वर्गात उत्साह दिसून येत आहे.
---------------------------
इंदापूर तालुक्यात पोषक हवामानामुळे गव्हाचे मळे फुलले आहेत.
०७०२२०२१-बारामती-०२