शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

व्हॉट्स अ‍ॅपवर ‘चर्चा तर होणारच’

By admin | Updated: February 18, 2017 03:48 IST

‘जब गरीब की थाली में पुलाव आया, तो समझ लेना भारत में चुनाव आया’ किंवा ‘अब की बार, कुणाचेही सरकार, इथे दुपारी

पुणे : ‘जब गरीब की थाली में पुलाव आया, तो समझ लेना भारत में चुनाव आया’ किंवा ‘अब की बार, कुणाचेही सरकार, इथे दुपारी झोपतो मतदार’ अशा मेसेजनी सध्या नागरिकांचा मोबाईल खणखणत आहे. व्हॉट्स अ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच, राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून मेसेजमधून प्रचाराचा धुरळा उडत आहे.रिक्षातून केला जाणारा प्रचार, घरोघरी जाऊन मतदारांची घेतलेली भेट याही पुढे जाऊन व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. विरोधकांवर टीका करतानाच, स्वत:ची बाजू पटवून देणारे मेसेज, तसेच जास्तीत जास्त  मतदान करण्याचे आवाहन व्हॉट्स अ‍ॅप मेसेजच्या माध्यमातून केले  जात आहे. आश्वासनांची खैैरात, प्रचारी भाषणांबरोबरच मेसेजचे माध्यम परिणामकारक ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मेसेजमध्ये स्वत:चा प्रचार आणि विरोधकांवर टीका करण्यासाठी आकर्र्षक वाक्यांचा वापर केला जात आहे.‘आता ही अफवा कोणी पसरवली की निवडणूक चिन्ह बदलले आहे’, ‘हे बटन दाबून बघा, तुम्हाला तुमच्या हक्काचा उमेदवार मिळेल’, ‘आयडियाचा टॉवर आणि शिवसेनेची पॉवर फुलच मिळणार’ अशा मेसेजची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मेसेजच्या माध्यमातून पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर असा कलगीतुराही रंगत आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून मारलेल्या कोपरखळ्या चांगलेच मनोरंजन करत आहेत.महानगरपालिका निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या जात आहेत. या सभेतील नेत्यांची वक्तव्येही मेसेजच्या माध्यमातून चर्चिली जात आहेत. ‘मुळा-मुठेचे नाव बदलून टाका’, ‘पुण्याला स्मार्ट कसे करणार? आम्ही स्मार्टच आहोत’, ‘नोटा’बंदी केली तरी मतदानासाठी ‘नोटा’च वापरणार’, ‘प्रचारसभेचा नवीन फंडा’ अशा मेसेजमधून निवडणुकीमध्ये वेगळेच रंग भरले आहेत.निवडणूक प्रचाराला व्हॉट्स अ‍ॅप मेसेजमुळे हायटेक रंग चढला असला, तरी हा फंडा प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कितपत उपयोगाला येणार, अशी चर्चाही उमेदवार तसेच मतदारांमध्ये होत आहे. मेसेजकडे बरेचदा केवळ करमणूक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे यातून केवळ मनोरंजन होणार की मतदारांचे मतपरिवर्तन होणार,  याची प्रचिती निकालानंतरच पाहायला मिळेल, असे मत व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)