शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उजनी जलाशयात परप्रांतीय मच्छीमारांची अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:24 IST

इंदापूर तालुक्यातील उजनी धरण क्षेत्रात बेकायदेशीररीत्या परप्रांतीय मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. मात्र, इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी काट्यावर मासळी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य धरणग्रस्त मच्छीमारांवर जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी अरेरावीची भाषा करून कायद्याचा बडगा उगारत आहेत.

न्हावी  - इंदापूर तालुक्यातील उजनी धरण क्षेत्रात बेकायदेशीररीत्या परप्रांतीय मच्छीमारांकडून मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. मात्र, इंदापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मासळी काट्यावर मासळी घेऊन येणाऱ्या सर्वसामान्य धरणग्रस्त मच्छीमारांवर जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी अरेरावीची भाषा करून कायद्याचा बडगा उगारत आहेत.याउलट जे स्थानिक धरणग्रस्त मच्छीमार आहेत, त्यांना कायद्याचा धाक दाखवून आणि अरेरावीची भाषा वापरून परवाना पास फाडून त्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा तगादा सुरू आहे. वास्तविक स्थानिक धरणग्रस्त मच्छीमार लोकांचा परवाना फाडण्यास कोणताही विरोध नाही. मात्र, जे परप्रांतीय मच्छीमार उजनी धरणात कोणताही अधिकारनसताना शासकीय नियम पायदळी तुडवून बेसुमार मच्छीमारी करीत आहेत, अगोदर त्यांच्यावर आणि त्यांना घेऊन येणाºया गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदारांवर कारवाई करा, तेव्हाच आम्ही परवाना पास काढू, असा पवित्रा स्थानिक धरणग्रस्त मच्छीमारांनी घेतला आहे.उजनी धरण क्षेत्रात मासेमारीसाठी स्वतंत्र मत्सविभाग असताना केवळ धरण सुरक्षिततेच्या नावाखाली हे धरण जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. हे जर असेच चालू राहिले तर स्थानिक मच्छीमारावर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नसल्याची खंत येथील मच्छीमारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.राज्यातील उजनी धरण हे सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे धरण आहे. यावर विविध लोक मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, याच उजनी परिसरात बेकायदेशीर आलेल्या परप्रांतीय मच्छीमारांकडून बेसुमार मत्स्यखाद्य व मत्स्य बीज मारले जात आहे. तसेच भरमसाठ मासे पकडून मोठे होण्याच्या हव्यासाने या परप्रांतीय मच्छीमारांकडून विविध प्रकारची विषारी रसायने भातात मिसळून ते पाण्यात टाकून मासळी पकडून ती तालुक्यातल्या नजीकच्या काट्यावर लिलाव करून रातोरात मालामाल होत आहेत.या सर्व गोष्टींची कल्पना जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना आहे. मात्र, या लोकांकडून ठरलेली माया वेळोवेळी घरपोच होते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई होताना दिसत नाही, असा स्थानिकांचा आरोप आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या