शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कच-याच्या वजनमापात पाप, कोट्यवधींचा निधी जातोय लाटला, चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:54 IST

पुणे : महापालिकेच्या काही कचरा प्रकल्पांवर कच-याचे वजन प्रत्येक ट्रकमागे ५ ते ६ टनाने फुगविले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये निष्पन्न झाले आहे.

पुणे : महापालिकेच्या काही कचरा प्रकल्पांवर कच-याचे वजन प्रत्येक ट्रकमागे ५ ते ६ टनाने फुगविले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये निष्पन्न झाले आहे. यातून प्रत्येक टनामागे महापालिकेकडून मिळणारे अनुदान लाटून कोट्यवधींचा गैरव्यवहार होत आहे. त्याचबरोबर कचरा प्रकल्पांमधील अनेक गैरप्रकार स्वयंसेवी संस्थांच्या व कार्यकर्त्यांच्या पाहणीमध्ये उजेडात आले आहेत. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.महापालिकेने गेल्या दहा वर्षांत अनेक कचरा प्रकल्पांची उभारणी करून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी अद्याप कचरा प्रश्न सुटू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर कचरा प्रकल्पांवर झालेला खर्च व प्रत्यक्षात त्यांची स्थिती याचा अभ्यास करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन समिती स्थापन केली आहे. मनसेचे शहर सचिव प्रशांत कनोजिया, काँग्रेसचे सरचिटणीस हृषीकेश बालगुडे, लोकहित फाउंडेशनचे अझहर खान, वडगावशेरी नागरिक मंचचे आशिष माने यांनी कचरा प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत.शहरामध्ये १७०० ते १८०० टन कचरा दररोज तयार होतो असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात शहरात केवळ एक हजार टन कचरा तयार होतो आहे. काही कचरा प्रकल्पांवर प्रत्येक ट्रकमागे ५ ते ६ टन कचरा जास्त दाखविला जातो आहे. हडपसर येथील भूमिग्रीन कचरा प्रकल्पाला भेट दिली असता ट्रकचे वजन १६०० टन भरले असताना प्रत्यक्षात रजिस्टरवर २१०० टन कच-याची नोंद करण्यात आल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे. महापालिकेकडून प्रतिटनानुसार कचरा प्रकल्पांना अनुदान देण्यात येते. त्यामुळे पालिकेचे कोट्यावधी रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. यामध्ये वरिष्ठ अधिका-यांपासून अनेकांचा सहभाग नाकारता येत नाही, त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी प्रशांत कनोजिया व हृषीकेश बालगुडे यांनी केली.रोकेम प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नाही, तसेच वीजनिर्मिती होणे अपेक्षित असताना ती केली जात नसल्याचे आढळून आले. शहरात ५ टनाचे २५ बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रत्येक प्रकल्पाचा खर्च ९४ लाख ५० हजार दाखविण्यात आला आहे. यातील काही प्रकल्पांमधून तयार होणारा बायोगॅस हा ज्योत पेटवून वाया घालविला जातो. प्रकल्प बंद असताना दररोज ५०० ते १००० रुपयांचा दंड संबंधित ठेकेदाराला करणे आवश्यक आहे, मात्र मनपाकडून ते केले जात नाही.>अग्निशामकची यंत्रणा नाही : कचºयाला आग लागण्याची सातत्याने घडतेय घटनाकचरा हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. कचºयाला आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. मात्र रोकेम वगळता एकाही कचरा प्रकल्पाने अग्निशामक दलाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. त्यामुळे अग्निशामकची पुरेशी यंत्रणा कचरा प्रकल्पांवर उपलब्ध नसल्याचे उजेडात आले आहे.पाहणी करू देण्यास मज्जावकचरा प्रश्न अभ्यास समितीच्या वतीने अनेक कचरा प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. मात्र वडगाव येथील भूमिग्रीन या ५० टनाच्या प्रकल्पाची पाहणी करू देण्यास तिथल्या ठेकेदाराच्या कर्मचाºयांनी मज्जाव केला. तिथला वजनकाटा हा ठेकेदाराच्या मालकीचा असून, तो प्रत्येकगाडीमागे १ टनापेक्षा जास्त वजन दाखवित असल्याचा आरोप प्रशांत कनोजिया व हृषीकेश बालगुडे यांनी केला.

टॅग्स :Puneपुणे