पुणे : शहरात बुधवारी २९२ कोरोनाबाधित आढळून आले असून, १८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर १० हजार १५६ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २़ ८७ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ३६३ इतकी आहे. आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रुग्णसंख्या ही २०५ इतकी असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८४ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३१ लाख ४३ हजार ४६७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९५ हजार ८७८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८४ हजार ५८४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ९३१ जणांचा मृत्यू झाला आहे.