शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आराेग्य विभागाचे संकेतस्थळ ‘काेमात’ अर्ज भरताना तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी हैराण

By प्रशांत बिडवे | Updated: September 18, 2023 21:58 IST

आराेग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील १० हजार ९४९ जागांवर पदभरती सुरू आहे.

पुणे : आराेग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील १० हजार ९४९ जागांवर पदभरती सुरू आहे. त्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्याचा साेमवारी दि. १८ पर्यंत अंतिम मुदत दिली हाेती. अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने आराेग्य विभागाचे सर्व्हर डाउन झाले अन असंख्य उमेदवारांना मुदतीत अर्ज दाखल करण्यासाठी तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

सार्वजनिक आराेग्य विभागाच्या संकेतस्थळावर दि. २९ ऑगस्ट राेजी दुपारी तीन वाजता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली. तसेच १८ सप्टेंबर राेजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत मुदत देण्यात आली हाेती. मात्र, अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने संकेतस्थळावर ताण आला आणि अर्ज भरण्यास अनेकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अर्ज भरताना फाेटाे, प्रमाणपत्र अपलाेड करणे तसेच शुल्क जमा करताना वारंवार संकेतस्थळ बंद पडत हाेते त्यामुळे पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी

ऑनलाईन अर्ज भरताना संकेतस्थळ बंद पडत असल्याबाबत आराेग्य मंत्र्यांच्या स्वीय सहायकांकडे तक्रार केली. तसेच मुदत वाढवून मिळावी यासंदर्भात विनंती केली आहे.- महेश घरबुडे कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समितीऑनलाईन अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा केले. माझ्या बॅंक खात्यातून पैसे कपात झाल्याचा मेसेज प्राप्त झाला मात्र, पेमेंट स्टेटस फेल दाखवत आहे. दिवसभरात अनेकदा साईट एरर दिसत हाेती. गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेट कॅफे बंद असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.- सचिन मतकर, उमेदवार

अर्ज अर्धवट भरलेला असतानाच संकेतस्थळ अचानक बंद पडत हाेते. मी तीन ते चार वेळा अर्ज भरला मात्र, प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात अपलाेड केले मात्र, नेमके शुल्क जमा करताना संकेतस्थळ बंद पडत हाेते.- भक्तराम फड, उमेदवार