शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

‘आमचा नील्या आम्हाला परत हवा आहे’

By admin | Updated: May 9, 2017 03:33 IST

लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटत असताना त्याचा गंभीर अपघात झाला. मेंदूला जबरदस्त मार लागला. त्यामुळे आठ दिवसांपासून

रविकिरण सासवडे । लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटत असताना त्याचा गंभीर अपघात झाला. मेंदूला जबरदस्त मार लागला. त्यामुळे आठ दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देतोय. वडील आणि भाऊ मजुरी करीत असल्याने त्याच्या उपचारासाठी पैसे कोठून आणायचे? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. परंतु आपल्या जीवाभावाच्या दोस्तासाठी त्याच्या मित्रांनी सोशल मीडियामधून ‘एक हात मदतीचा’ ही मोहीम उघडली. त्या माध्यमातून प्रत्येक जण आपापल्या परीने आर्थिक मदत करीत आहे. मात्र उपचाराचा खर्च मोठा असल्याने या मित्रांनीदेखील आता मदतीचे आवाहन केले आहे. कळंबोली (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील रहिवासी असलेला नीलेश शामराव खरात व प्रणय गावंड हे दोघे जण, गावंड याच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी गेले होते. रांजणगाव गणपतीवरून माघारी पुण्याच्या दिशेने येत असताना वाघोलीनजीक या दोघांचा पुणे-अहमदनगर महामार्गावर २९ एप्रिलला गंभीर अपघात झाला. हा अपघात इतका गंभीर होता, की प्रणय गावंड याचा जागीच मृत्यू झाला, तर नीलेश खरात याच्या मेंदू, मणका, आतडे तसेच उजवा पाय व हातास गंभीर दुखापती झाल्या. अपघात झाल्या दिवसापासून नीलेशची शुद्ध हरपली आहे. त्याच्या अपघाताची बातमी समजताच वालचंदनगर, कळंब परिसरातील त्याच्या वर्गमित्रांनी रुग्णालयात धाव घेतली. नीलेशवर सुरुवातीला झालेल्या उपचाराचा सर्व खर्च योगेश ढगे यांनी केला. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही जिद्दीने ‘कमवा आणि शिका’ योजनेतून शिक्षण पूर्ण केलेल्या या दोस्तासाठी होता-होईल तेवढी मदत करण्याचा निर्णय प्रत्येकाने घेतला. त्यासाठी विकास कुंभार, कुलदीप सूर्यवंशी, मेघनाथ आवटे यांनी पुढाकार घेतला. व्हॉट्सअ‍ॅपवर ‘एक हात मदतीचा’ या नावाचा ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून कळंब महाविद्यालयातील सगळ््या वर्गमित्रांना जोडून घेतले. नीलेशच्या प्रकृतीची आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना देण्यात आली. त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपापल्या परीने मदत केली. सध्या ८० ते ९० हजारांच्या आसपास मदत गोळा झाली आहे. मात्र नीलेश अद्यापही शुद्धीवर आला नाही. त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. सुरुवातीला कात्रज येथील खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले होते. तेथील उपचाराचा खर्च मोठा होता. तीन ते चार दिवसांतच ९२ हजार बिल झाले. ही सर्व बिलाची रक्कम मित्रांनी गोळा केलेल्या मदतीतून भरली गेली. सध्या नीलेशला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.