शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘आमचे आम्ही’कडे साय-फाय करंडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 02:39 IST

सायबर सुरक्षेवर आधारित थीम : ‘एफ ५७’ला द्वितीय आणि ‘कम्युनिकेशन एरर’ला तृतीय क्रमांक

पुणे : सायबर सुरक्षेच्या गरजेविषयी सादर झालेल्या एकाकिंका स्पर्धेत ‘आय अँग्री’ (आमचे आम्ही) या एकाकिंकेने विजेतेपदावर नाव कोरून ‘साय-फाय करंडक’ पटकावला. ‘एफ 57’ (नाट्यसंस्कार) आणि कम्युनिकेशन एरर (स्वप्नपूर्ती क्रिएशन्स, मुंबई) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला.

क्विक हील फाउंडेशनने महाराष्ट्र सायबर आणि थिएटर अ‍ॅकॅडेमी यांच्या सहयोगाने सकळ ललित कलाघर येथे आयोजित केलेल्या अंतिम फेरीतील विजेत्या संघाची घोषणा करण्यात आली. सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने योजलेल्या या अनोख्या एकांकिका स्पर्धेस स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रातून १०० पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या होत्या. थिएटर अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध रंगकर्मी प्रसाद पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, गोवा आणि नागपूर या प्रादेशिक केंद्रांमध्ये आॅडिशन घेऊन अंतिम फेरीसाठी ९ टीमची निवड केली होती. यामधून पुणे येथील ‘आमचे आम्ही’ टीम विजेती ठरली. प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते रितेश देशमुख आणि जॅकी श्रॉफ उपस्थित होते, तर विजय केंकरे आणि आनंद इंगळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.या वेळी क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे कैलाश काटकर, महाराष्ट्र सायबरचे सचिन पांडकर आणि प्रसाद पुरंदरे यांच्या हस्ते विजेत्या टीमचा सत्कार केला.करंडकाच्या माध्यमातून जागरूकता१ कैलाश काटकर म्हणाले, ‘‘प्रकाश जितका तेजस्वी, तितकीच त्याची सावली गडद असते. डिजिटल टेक्नॉलॉजी ही काहीशी या प्रकाशासारखीच आहे. त्याचे लाभ आपण घेतो, तेव्हा त्याचे धोके आणि त्याच्या जोखमा यांची जाणीवदेखील आपल्याला असली पाहिजे.२साय-फाय करंडकाच्या माध्यमातून अधिक चांगल्या सायबर सुरक्षेच्या गरजेबाबत जागरूकता निर्माण करणे, हा क्विक हील फाउंडेशनचा उद्देश होता.३ ’साय-फाय करंडक २०१८च्या अंतिम फेरीत विचारप्रवर्तक आणि आजच्या काळाच्या एकांकिका सादर झाल्या, ज्यातून आजच्या डिजिटल-प्रेरित जीवनशैलीचे आणि यूझरसमक्ष असलेल्या जोखमांचे दर्शन झाले. 

टॅग्स :Puneपुणे