शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

देशी गाय नामशेष होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 00:59 IST

गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

रावणगाव : गोमातेला हिंदू धर्मामध्ये ३३ कोटी देवांचे रूप मानले जाते. ज्या गोमातेला पावित्र्याचे, आईचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते. तीच गोमाता अर्थात देशी (साधी) गाय दिवसेंदिवस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे होत असलेले तुकडीकरण, शासकीय प्रकल्पासाठी घरे बांधणे, दुकाने, मॉल्स, आॅफिसेस, कारखाने अशा विविध कारणांसाठी जमिनीचे होत असलेले संपादन; तसेच पावसाची कमतरता, सतत पडणारा दुष्काळ यामुळे चाऱ्याची कमतरता भासत आहे. अशावेळी देशी गार्इंना खाद्यपुरवठा दिवसेंदिवस महागाच होत आहे. देशी गार्इंपासून उत्पन्नदेखील कमी मिळते. त्यामुळे देशी गाई सांभाळणे परवडत नसल्याची शेतकºयांची भावना झाली आहे. पूर्वी शेतीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे; परंतु यांत्रिकीकरणाच्या युगात शेतीची नांगरणी, पेरणी, मळणी अशी जवळ जवळ सर्वच कामे यंत्रांच्या साहाय्याने झटपट करता येऊ लागल्याने शेतीमशागतीत बैलांचा वापर कमी होऊ लागल्याने देशी गाईंचे महत्त्व आपोआपच कमी होऊ लागले आहे.गेल्या काही दशकांपासून देशी गाईची जागा संकरित गाईने घेतली आहे. संकरित गाईपासून मिळणाºया दुधाच्या तुलनेत देशी गाईंपासून खूपच कमी प्रमाणात दूध मिळत असल्यामुळे देशी गाईच्या पालनाकडे शेतकरी दिवसेंदिवस दुर्लक्ष करीत आहेत. जसजशी देशी गाईंची संख्या कमी कमी होऊ लागली आहे, तस तसे बैलपोळासारख्या सणांनादेखील खºयाखुºया बैलांऐवजी मातीचे अथवा लाकडाचे बैल खरेदी करून त्यांची पूजा करण्याची वेळ लोकांवर आली आहे. गोमातेच्या गोमुत्रामुळे बरेचसे आजार दूर होतात तीच गोमाता अलीकडे बोटावर मोजण्या एवढ्याच शेतकºयांकडे पाहावयास मिळत आहे.पूर्वी गावाकडे देशी गाईंचे कळप माळरानावर चरताना मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळत होते. दिवसेंदिवस ते चित्र दुर्मिळ होत चालले आहे. त्यामुळे देशी गाई आत्ता गोशाळेमध्येच मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहेत. परिणामी, देशी गाईचे दुधासह तूप मिळणेदेखील दुरापास्त होऊ लागले आहे. पूर्वीचे वैभवशाली दिवस पुन्हा प्राप्त करावयाचे असतील तर शेतकºयांनी देशी गाईंचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले पाहिजे>का होऊ लागली देशी गाय नामशेष?पावसाची अनियमितता, सतत पडणारा दुष्काळ, दिवसेंदिवस नष्ट होत असलेली चराऊ कुरणे, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचावाढता वापर.