शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

पुणे स्मार्ट होण्याचा मार्ग करवाढीतूनच

By admin | Updated: January 30, 2016 04:06 IST

सलग १४ तास चर्चेच्या मंथनातून नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावात केलेल्या उपसूचना डावलूनच केंद्र सरकारने पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या आराखड्याला मंजुरी दिली

पुणे : सलग १४ तास चर्चेच्या मंथनातून नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या प्रस्तावात केलेल्या उपसूचना डावलूनच केंद्र सरकारने पुण्याच्या स्मार्ट सिटीच्या आराखड्याला मंजुरी दिली असल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारच्या या योजनेत दुसऱ्या क्रमांकाने निवड झाल्यानंतर पालिका प्रशासनाने त्वरित स्मार्ट सिटी प्रस्तावातील स्वतंत्र कंपनीसह अनेक गोष्टींची प्राथमिक तयारी करण्यास सुरुवात केली आहे.केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज पुण्यातच स्मार्ट सिटीतील सुविधा हव्या असतील तर त्यासाठी अतिरिक्त कर द्यावाच लागेल, असे जाहीर वक्तव्य केले. त्यामुळे पुणे महापालिकेने स्मार्ट सिटीच्या प्रस्तावाबरोबरच पाठवलेल्या सर्व उपसूचनांना केंद्र सरकारने केराची टोपली दाखवल्याचे उघड झाले. ‘कसलीही करवाढ नको, करायची असल्यास त्यासाठी महापालिकेची संमती घ्यावी लागेल’ अशी थेट शब्दरचना असलेली उपसूचना सर्वसाधारण सभेने केली होती. औंध-बाणेर-बालेवाडी हा स्मार्ट सिटीतील भाग विशेष स्मार्ट करण्यासाठी तिथे तब्बल १ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असले तरी तेथील नागरिकांना त्यातून तयार झालेल्या सुविधांचा वापर करण्यासाठी अतिरिक्त कर द्यावा लागणार, असाच नायडू यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे.महापालिकेची यंत्रणा असताना स्मार्ट सिटीसाठी पुन्हा अतिरिक्त स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याला सर्वच नगरसेवकांचा विरोध होता. मात्र, पक्षनेत्यांनी विरोध मवाळ केल्यानंतर कंपनीला मान्यता देत तिच्या अध्यक्षपदी आयुक्त किंवा विभागीय आयुक्तांऐवजी महापौर असावेत, अशी उपसूचना होती. कंपनीच्या अध्यक्षपदावर कोणतीही राजकीय व्यक्ती नको, अध्यक्षपद वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांकडे असावे, असेच केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या याही उपसूचनेला वाटाण्याच्या अक्षता लागल्याचे उघड झाले आहे. सरकारी अधिकाऱ्यांमुळे कंपनीच्या कारभारापासून राजकीय पदाधिकारी दूरच राहणार आहेत.याशिवाय कंपनीच्या सदस्यसंख्येत लोकप्रतिनिधींची संख्या जास्त असेल, कंपनीला महापालिकेची मालमत्ता गहाण टाकता येणार नाही, त्यावर कर्ज काढण्यापूर्वी पालिकेची संमती घ्यावी लागेल, कर्जाबाबतच्या अटी, शर्ती पालिकेच्या सर्वसाधारण सभेकडून मंजूर करून घ्यावा लागतील, क्षेत्र विकास परिसरात कंपनी करणार असलेल्या सुविधा महापालिकेच्या विकास आराखड्याशी सुसंगत असतील, या परिसराला कसलाही अतिरिक्त कर लावता येणार नाही, कंपनी महापालिका क्षेत्रात कुठेही स्वतंत्रपणे कर जमा करणार नाही.लोकप्रतिनिधींच्या उपसूचना केंद्र सरकारने सुचवलेल्या आराखड्याशी सुसंगतच आहेत. त्यात फारसा फरक नाही. त्या डावलल्या असे म्हणता येणार नाही. आम्ही सुचवलेल्या कंपनीच्या रचनेत व केंद्र सरकारने दिलेल्या रचनेतही अध्यक्षपदी राजकीय व्यक्ती नको, हे वगळल्यास फारसा फरक नाही.- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका.