यवत : उंडवडी (ता. दौड) येथे मुळा-मुठा नदीच्या पात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, यामुळे प्रदूषणासाह पाणी दूषित होत आहे. अशा प्रकारच्या जलपर्णी वारंवार वाढत असून, जलपर्णी काढण्यासाठी शासकीय पातळीवर विशेष उपाययोजना करण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.पुण्यातील सांडपाण्यामुळे दूषित पाणी मुळा-मुठा नदीच्या पात्रात येत असते. दौड तालुक्यात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असल्याने पाणी नदीत स्थिर अवस्थेत असते. यामुळे जलपर्णी वाढत आहेत. शेतीसाठी पाणी वापरताना या जलपर्णीचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. नदीच्या आजूबाजूला असलेल्या अनेक गावांतील कुटुंबे नदीत मासेमारी करून त्यांचा उदरनिर्वाह भागवत असतात. मात्र जलपर्र्णी वाढल्यास त्याचा परिणाम मासेमारी व्यवसायावरदेखील होतो. नदीतील जलचरदेखील जलपर्र्णीमुळे मृत पावतात. अनेक वेळा स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते लोकवर्गर्णी अथवा स्व-खर्चातून सदर जलपर्र्णी काढण्याचा प्रयत्न करतात; मात्र काही महिन्यात जलपर्र्णी परत वेगाने वाढते. जलपर्णीमुळे पाणी दुषीत झाले आहे. याचा परिणाम येथील नारिकांच्या आरोग्यावर होत आहे. (वार्ताहर)
मुळा-मुठा नदीवर जलपर्णीची चादर
By admin | Updated: January 18, 2016 01:19 IST