शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

पाणीकपातीचा फटका, टँकरच्या संख्येतं मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 1:13 AM

महिन्याला १८ ते २० हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा : गेल्या ३ महिन्यांत टँकरच्या संख्येत ३ ते ४ हजारांची वाढ

सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : शहरात सध्या सुरू असलेल्या अघोषित पाणीकपातीचा मोठा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसत असून, गेल्या तीन महिन्यांत शहरात टँकरच्या फेऱ्यांत मोठी वाढ झाली असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे उपनगरांबरोबरच शहराच्या मध्यवस्तीतही अनेक सोसायट्यांना सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सप्टेंबर २०१८मध्ये मुठा उजवा कालवाफुटीनंतर शहरामध्ये गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यानंतर महापालिका मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलते, असे सांगून जलसंपदा विभागाने पोलीस बंदोबस्तात खडकवासला धरणावरील महापालिकेचे पंपिंग स्टेशन बंद केले होते. तर, सध्या राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा अत्यंत काटकसरीने वापरण्याची गरज असल्याचे सांगून कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहराचा पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लोकसंख्येनुसारच महापालिकेला पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय दिला.यामुळे तीन महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा सातत्याने विसकळीत होत आहे. सध्या प्रशासनाकडून पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचा दावा केला जात असला, तरी शहरातील टँकरची वाढलेली संख्या लक्षात घेता, शहरामध्ये अघोषित पाणीकपात सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.शहरात वर्षभर काही भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु पाणीकपातीच्या चर्चेमुळे टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली. आतापर्यंत प्रामुख्याने वडगावशेरी, विश्रांतवाडी, चंदननगर, खराडी या भागात सर्वांधिक टंचाई होती; परंतु आता हडपसर, बाणेर, धायरी या उपनगरांसह शहराच्या मध्यवस्तीत लॉ कॉलेज रोड, कर्वेनगर, कोथरूड, सहकारनगर आदी सर्वच भागांमध्ये टँकरची मगाणी वाढत आहे. महापालिकेचे टँकर कमी पडत असल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या खासगी टँकर लॉबीकडून नागरिकांची अडवणूक केली जात आहे.शहरातील गेल्या दोन वर्षांतील टँकरची संख्यामहिने वर्ष व टँकरची संख्या२०१५-१६ २०१६-१७ २०१७-१८ २०१८-१९सप्टेंबर १५४५२ १२५२६ १५९६६ १८२३५आॅक्टोबर १६२३३ १२५४२ १००२९ २०३०९नोव्हेंबर १३४६४ १२४३१ १६२६५ १७७९४Þडिसेंबर १४९६१ १३२४७ १५५७१ १९४१५आॅक्टोबरपासूनच टॅँकरच्या संख्येत वाढमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, शहरामध्ये आॅक्टोबरपासूनच टँकरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली. सरासरी १६ ते १७ हजार टँकर दर महिन्याला लागत असताना आॅक्टोबरपासून टँकरची संख्या तब्बल २० हजारांच्या पुढे गेली. डिसेंबर २०१८ मध्ये ती शहरामध्ये एका महिन्यात १९ हजार ४१५ वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये महापालिकेच्या टँकरची संख्या १ हजार ९४० असून, ठेकेदार नियुक्त करून तब्बल १२ हजार ६६४ टँकरद्वारे आणि खासगी ४ हजार ८१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.मागणीनुसार टँकर पुरविण्यात येतातशहरामध्ये गेल्या काही महिन्यांत टँकरचीमागणी वाढली आहे. महापालिकेच्या टँकरबरोबरच प्रशासनाने निविदा काढून खासगी ठेकेदारांचे टँकरदेखील मोठ्या प्रमाणात सुरु केले आहेत.यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार त्यांची गरज लक्षात घेऊन महापालिकेकडून टँकर पुरविण्यात येतात.-व्ही. जी. कुलकर्णी,पाणीपुरवठा विभागप्रमुख

टॅग्स :Puneपुणे