शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

... तर भाटघर धरणग्रस्त घेणार जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:06 IST

भाटघर धरणग्रस्तांच्या वतीने विविध मागण्यांसाठी वाकांबे (ता. भोर) येथे धरणे आंदोलन साखळी उपोषण करण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास धरणग्रस्त भाटघर धरणात जलसमाधी घेणार असल्याची माहिती

भोर : भाटघर धरणग्रस्तांच्या वतीने विविध मागण्यांसाठी वाकांबे (ता. भोर) येथे धरणे आंदोलन साखळी उपोषण करण्यात येणार असून, मागण्या मान्य न झाल्यास धरणग्रस्त भाटघर धरणात जलसमाधी घेणार असल्याची माहिती भाटघर प्रकल्प पुनर्वसन समितीचे सरचिटणीस आनंद सणस यांनी दिली.भाटघर जलाशयात २२ प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी मिळाली. त्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी, प्रकल्पातील ४० गावांतील पिण्याचे व शेतीच्या कामासाठी धरणात २५ टक्के आरक्षण मिळावे, भाटघर धरणात वेळवंड ते कांबरे या पुलासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, ४० गावांना मोफत वीज द्यावी, भाटघर येथे स्वतंत्र पुनर्वसन उपविभाग सुरू करावा, या मागण्यांसाठी समितीचे अध्यक्ष भगवान कंक यांच्या प्रमुख उपस्थितीत व समितीचे सरचिणीस सणस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धरणग्रस्त १० आॅक्टोबरला सकाळी ९ वाजल्यापासून १७ आॅक्टोबरपर्यंत धरणे आंदोलन व साखळी उपोषण करणार आहेत. मागण्या मान्य झाल्या नाही तर १८ आॅक्टोबरला दुपारी धरणात जलसमाधी घेण्यात येणार आहे.

२००८ साली मौजे वाकांबे येथे भाटघर धरणात होडीतून प्रवास करताना सुमारे २२ प्रकल्पग्रस्तांना जलसमाधी मिळाली होती. तर मागील ९४ वर्षांत १५० प्रकल्पग्रस्तांना वेळोवेळी प्राण गमवावे लागले असून, कोणालाही मोबदला मिळालेला नाही. भाटघर प्रकल्पग्रस्त पुनर्वसन समितीच्या वतीने ताराचंद गोरड, जगन्नाथ ओंबळे, सुरेश ओंबळे, दत्तात्रय ओंबळे, निवृत्ती ओंबळे, शंकर ओंबळे यांच्यासह अनेक प्रकल्पग्रस्तांनी आमदार, जलसंपदा विभाग, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे.भाटघर धरणग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून राजकारण बाजूला ठेवून अनेकदा आंदोलनात सहभाग घेतला आहे. तत्कालीन पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्याकडे धरणग्रस्तांच्या दाखल्यांसाठी पाठपुरावा करून दाखले मिळावे म्हणून जीआर मंजूर करून घेतला. मात्र, सरकार बदलले आणि त्याची अंमलबजावणी रखडली. पुन्हा पाठपुरावा करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.- संग्राम थोपटे, आमदार

टॅग्स :Puneपुणे