नागरिकांना पाण्याची कमतरता वारंवार भासत होती. नागरिकांना कमी दाबाने ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी शुभम सावंत आणि अजिंक्य हरगुडे यांनी साई हिल्स नावाच्या गृहप्रकल्प सुरू असलेली पाणीचोरी पकडून उजेडात आणली आहे. माजी उपसरपंच सचिन जाधव, दिनेश झांबरे, प्रमोद हरगुडे, संतोष गावडे, गणेश हरगुडे, मल्हारी भंडकर, नवनाथ साळुंके, गणेश जाधव, बाबासाहेब हरगुडे, राजेश दरेकर आदी ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी यांनी पाणीचोरी पकडून या ठिकाणी सुरू असलेले बेकायदा पाणीपुरवठा तूर्तास पाणी बंद केला आहे.
दरम्यान, केसनंद गावामध्ये अजून कुठे पाणीचोरी होते का याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने शोधमोहीम सुरु केली आहे. पाणीचोरी उघडकीस आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सरपंच रोहिणी जाधव यांनी सांगितले.