शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा मांडणार पाणीवाटपाचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:19 IST

शहराची नेमकी लोकसंख्या, तरती लोकसंख्या, शहरालगतच्या गावांना करण्यात येणारा पाणीपुरवठा, त्यानुसार वाढीव पाण्यासाठी महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (एमडब्ल्यूआरआरए) बाजू मांडण्याच्या तयारीत आहे.

पुणे : शहराची नेमकी लोकसंख्या, तरती लोकसंख्या, शहरालगतच्या गावांना करण्यात येणारा पाणीपुरवठा, त्यानुसार वाढीव पाण्यासाठी महानगरपालिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे (एमडब्ल्यूआरआरए) बाजू मांडण्याच्या तयारीत आहे. जलसंपदा विभाग महापालिकेने शपथपत्रात दिलेल्या लोकसंख्येनुसार पाणीवाटप करण्यावर ठाम असून, महापालिकेचा दावा खोडण्यासाठी विभागाकडून पाणीवाटपाचे गणित सुनावणीत मांडण्यात येणार आहे.येत्या गुरुवारी (दि. १३) प्राधिकरणासमोर पाणीवाटपाबाबत सुनावणी होत आहे. त्यात पुणे महापालिका शहराची लोकसंख्या नक्की किती आहे, याबाबतही माहिती देणार आहे. तसेच शहराला सध्या मिळणाऱ्या पाण्यापेक्षा अधिकचे पाणी मिळावे, याकरिता प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारने लोकसंख्येवर आधारित पाण्याचा मापदंड ठरवण्याबाबत शासननिर्णय काढला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास शहराला मिळणाºया पाण्यात कपात होणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेला शहराची लोकसंख्या नक्की किती आहे, त्याची माहिती जलसंपत्ती प्राधिकरणाला सुनावणीदरम्यान द्यावी लागणार आहे. त्यानंतरच पुण्याला अधिकचे पाणी द्यावे की नाही, याबाबत निर्णय होईल.महापालिकेला शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि मापदंडानुसार पाणी द्यावे, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता यांच्याकडे देण्यात आला होता. पुणे महापालिकेने लोकसंख्येनुसार ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याऐवजी ८.१९ टीएमसी पाणीवापर करावा आणि प्राधिकरणाच्या धोरणांची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी घेतली. त्यावर महापालिकेने प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे. त्याची सुनावणी १३ डिसेंबरला होत असून, त्यामध्ये महापालिकेला लोकसंख्येची सुधारित माहितीही सादर करावी लागेल.शहराची लोकसंख्या ३९.१८ लाख, कॅन्टोन्मेंट बोर्ड व शेजारील गावे मिळून १.५८ लाख अशी एकूण ४०.७६ लाख लोकसंख्या असल्याचे शपथपत्र महापालिकेने यापूर्वी दिले आहे. प्राधिकरणाच्या मापदंडानुसार प्रतिमहिना १३५ लिटर आणि १५ टक्के गळती मिळून दरमहा दरडोई १५५ लिटर पाणी देता येणार आहे. त्यामुळे पुण्याला ८.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देणे योग्य ठरेल.महापालिकेचा २०१७-१८ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक १८.७१ टीएमसी पाणीवापर झाला आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०१७, जानेवारी-मार्च २०१८ या पाच महिन्यांत सरासरी प्रतिदिन १६०० दशलक्ष लिटर पाणीवापर आहे.याच कालावधीमध्ये काही वेळा महत्तम पाणीवापर प्रतिदिन १७५० दशलक्ष लिटरपर्यंत झाला आहे. असे विविध मुद्दे जलसंपदा विभागाकडून मांडले जाणार आहेत.