शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
3
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
4
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
5
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?
6
Mumbai on Alert: ४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
7
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
8
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
9
वॉशिंग्टनमधील मराठी कला मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षात १५०० भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप 
10
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
11
"चेंगराचेंगरीतून राजापर्यंत पोहोचण्याचं धाडस आम्ही केलं, पण...", 'लालबागचा राजा'च्या दर्शनाला गेलेल्या तुषार कपूरला आला असा अनुभव
12
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
13
Crime: ​​​​​​​स्पाय कॅमेऱ्याने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड; पायलटला अटक
14
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
15
आशिया चषक हॉकी: भारताचा धडाकेबाज विजय; मलेशियाचा ४-१ असा उडवला धुव्वा
16
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
17
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
18
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
19
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
20
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल

सम-विषम तारखांना पाणीपुरवठा

By admin | Updated: September 8, 2015 04:52 IST

शहराला एक दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने सोमवार, बुधवार, शुक्रवार व मंगळवार, गुरुवार, शनिवार असे दोन भाग करून शहराला पाणी देण्याचे

पुणे : शहराला एक दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने सोमवार, बुधवार, शुक्रवार व मंगळवार, गुरुवार, शनिवार असे दोन भाग करून शहराला पाणी देण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यामध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्याने सम व विषम तारखांनुसार पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तातडीने त्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या भागाला सोमवार, बुधवार, शुक्रवार असा पाणीपुरवठा होणार होता तिथे विषम तारखांना; तर मंगळवार, गुरुवार, शनिवार असा पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना सम तारखांना पाणीपुरवठा होणार असल्याची सुधारणा करण्यात आली आहे.शहरात सोमवार (७ सप्टेंबर)पासून पाणीकपातीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. विषम तारखांना पाणीपुरवठा होणार भाग : बंडगार्डन विभागात येरवडा, कलवडवस्ती, आळंदी रोड, कल्याणीनगर, विमाननगर, कोरेगाव पार्क, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, मंगळवार पेठ यांना पूर्वीप्रमाणे वेळेत पाणीपुरवठा होईल. चंदननगर, वडगावशेरी, चौधरीवस्ती, थिटेनगर, खुळेवाडी, खराडकर पार्क अभिरुची मॉल, हिंगणे परिसर, आपटे कॉलनी, खंडोबा परिसर, धायरी, डीएसके पायथा, साळुंखे विहार, कुदळे पार्क, विक्रांत पॅलेस, गोविंद अपार्टमेंट, विठ्ठलवाडी, महालक्ष्मी सोसायटी, दिनकर पठारेवस्ती, मारुतीनगर, माणिकबाग या परिसराला वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होईल. समतारखांना पाणीपुरवठा होणारा भाग : स्वारगेट जलकेंद्रातील दांडेकर पूल, सर्व पेठा, राजाराम पुलाच्या अलीकडील भाग यांना सकाळी ५ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होईल. लष्कर विभागात मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, महंमदवाडी, वानवडी, कोंढवा गावठाण, कॅम्प, ससून हॉस्पिटल येथे पूर्वीप्रमाणे वेळेत पाणीपुरवठा होईल.एसएनडीटी विभागात रामबाग कॉलनी काशिनाथ सोसायटी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमाननगर या परिसराला सकाळी ५ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होईल. कोथरूड गावठाण, डहाणूकर कॉलनी, गुजराथ कॉलनी, करिष्मा सोसायटी, मयूर कॉलनी, नळस्टॉप, मंगेशकर हॉस्पिटल, सुतारदरा, कर्वेनगर कॅनॉल, म्हाडा वसाहत, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर पोलीस ठाणे परिसर, शिवाजीनगर गावठाण, बोपोडी, औंध रोड, कामगार पुतळा येथील परिसरामध्ये वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.दररोज पाणीपुरवठा होणारा काही भाग : कोंढवा, साईनगर, गजानन महाराजनगर, काकडेवस्ती, अप्पर इंदिरानगर, बालाजीनगर, काशिनाथ पाटीलनगर, एलोरा परिसर, भारती विद्यापीठ, भारती विहार, धनकवडी गावठाण, साईदत्तनगर, कृष्णामाई सोसायटी, आंबेगावर पठार, दत्तनगर व सहकारनगर.(प्रतिनिधी)शुक्रवारपासून जाणवणार पाणीकपातीचे बदलप्रशासनाकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात येत्या शुक्रवारपासून त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली आहे. त्यामुळे आज शहराच्या बहुतांश भागात पाणीकपातीचा दिवस असतानाही पाणी आले होते. मात्र, नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, शुक्रवारपासून पाणीकपातीची प्रत्यक्षात परिणाम दिसून येतील, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.हॉटेलमध्ये बाटलीमधून पाणी द्यावेशहरातील पाण्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता, शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, उपाहारगृहे यांमधील ग्राहकांना ग्लासातून पाणी न देता पाण्याच्या बाटलीतून पाणी देण्यात यावे, अशी महत्त्वाची सूचना महापालिका प्रशासनाने केली आहे. त्याचबरोबर, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये होणाऱ्या बैठकांच्या वेळी होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा, अशीही सूचना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.वेळापत्रकातील झालेला बदलपाणीकपातीचे वेळापत्रक जाहीर करताना ज्या भागांना सोमवारी, बुधवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा होईल असे जाहीर केले होते, तिथे विषम तारखांना पाणीपुरवठा होणार आहे. तर, ज्या भागांना मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी पाणीपुरवठा होईल असे जाहीर करण्यात आले होते, तिथे सम तारखांना पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. पाण्याच्या वेळापत्रकात झाली चूकपाणीपुरवठा विभागाकडून पाण्याचे वेळापत्रक जाहीर करताना सोमवार, बुधवार, शुक्रवार व मंगळवार, गुरुवार, शनिवार अशा दोन टप्प्यांमध्ये पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले. मात्र, एक दिवसाआड तत्त्वानुसार शुक्रवारनंतर रविवारी दुसऱ्या भागाला शनिवारनंतर सोमवारी पाणीपुरवठा करावा लागणार होता. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला पाणी सोडण्याच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा लागला असता. सोमवारी प्रशासनाच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने निवेदन प्रसिद्धीला देऊन सम व विषम तारखांनुसार वेळापत्रक जाहीर केले आहे.