शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत १६ टँकरद्वारे १२ गावांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:41 IST

पाणीटंचाईची समस्या गंभीर : महिला ग्रामस्थांचे हाल

बारामती : तालुक्याच्या जिरायती भागातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सध्या जिरायती भागातील १२ गावांना व १४० वाड्या-वस्त्यांना १६ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टँकरच्या मागणीचे प्रस्तावदेखील पंचायत समितीकडे दाखल होत आहेत. त्यामुळे टँकरची संख्या वाढत जाणार आहे.

बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मुर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काºहाटी, पानसरेवाडी आदी गावांना शासकीय टँकरने, तर काळखैरवाडी, कारखेल, भिलारवाडी, जळगाव सुपे, बाबुर्डी, गाडीखेल, वढाणे, मुर्टी, मोढवे, उंडवडी, कडेपठार, खराडेवाडी, आंबी खुर्द आदी गावांना खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकूण १२ गावे व १४० वाड्या-वस्त्यांवरील ३१ हजार ७१७ लोकसंख्येला ६० पैकी ४९ खेपांद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. पुढील महिन्यापासून उन्हाचा चटका वाढणार आहे. परिणामी पाणीटंचाईची समस्या गंभीर स्वरूप धारण करेल. टँकरच्या मागणीतदेखील वाढ होणार आहे. पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता उन्हाळ्यात टँकरची संख्या ५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दुष्काळाच्या झळांमध्ये वाढ...

काºहाटी : बारामतीच्या जिरायती भागात दुष्काळाची भीषणता इतकी वाढली आहे, की झाडांना पाने राहिली नाहीत. पाण्याअभावी परिसरातील वटवृक्षांची पालवी संपूर्णपणे गळून गेली आहे.एरवी जानेवारी महिन्यामध्ये हिरवेगार असणारी झाडे डिसेंबरमध्येच पानगळती होऊन बसले आहेत. चार-पाच वर्षांच्या दुष्काळाचा परिणाम झाडाझुडपांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, कित्येक झाडे-झुडपे या दुष्काळातून नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना या दुष्काळात सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. सलग पाच वर्षांच्या दुष्काळाने कºहा नदीचे पात्र खळखळलेच नाही. दुष्काळामुळे जनावरांबरोबर पिण्याच्या पाण्याचा, तसेच चाºयाचा मोठा प्रश्न पुढील काही महिन्यांमध्ये अधिकच तीव्र होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामती