खोर : पडवी (ता. दौंड) परिसरामध्ये पाण्याच्या भीषण टंचाईला सुरुवात झाली आहे. दौंड पंचायत समितीकडे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची मागणी करूनदेखील आजपर्यंत टँकर सुरू केला नाही, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी नानासाहेब जगदाळे यांनी दिली. या वर्षी दर वर्षीपेक्षा जास्त पाण्याची टंचाई दौंड तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यात निर्माण झाली आहे. या भागामधील असलेल्या खोर, देऊळगावगाडा, नारायण बेट, माळवाडी, पडवी या सर्वच ठिकाणच्या भागामधील पाण्याची पातळीही खोलवर गेली असल्याने विहिरी, तलाव, ओढे, हातपंप पूर्णत: आटले गेले आहेत.पाण्याअभावी पडवी परिसरामधील शेती पडीक ठेवण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला गेला असल्याने जनावरांचा चारा असलेली मका, गवत ही पिकेदेखील शेतामध्ये करणे शेतकऱ्यांना अवघड होऊन बसले असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
पडवी परिसरात पाणीटंचाई वाढली
By admin | Updated: January 11, 2016 01:34 IST