शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जुन्नर, आंबेगावसाठी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:38 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. मुंबई येथे झालेल्या कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. येत्या दि. ५ पासून पाच कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात येणार असून ते या हंगामातील शेवटचे उन्हाळी आवर्तन असेल, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. आर. कानडे व शाखा अभियंता जे. डी. गळगे यांनी दिली.पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाकरिता शुक्रवारी मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहावर कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे हे होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. शरद सोनवणे, आ. बाबूराव पाचर्णे, आ. राहुल जगताप, राजेंद्र नागवडे,. जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे, मुख्य अधिकारी जयश्री काटकर, कुकडी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता के. आर. कानडे आदी उपस्थित होते.या वेळी कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगे व डिंभे धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उन्हाळी आवर्तनाचे पाणी पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व लोकप्रतिनिधींनी दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी केली. जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे यांनी ६.५ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. पिंपळगाव डावा मीना शाखा, डिंभे उजवा कालवा, मीना पूरक कालवा आणि घोड शाखा या कालव्यांद्वारे येत्या ५ मार्चपासून सोडण्यात येणार आहे. पिंपळगाव डावा मीना शाखा कालव्याद्वारे ३६ दिवस, डिंभे उजवा कालव्याद्वारे ४० दिवस, मीना पूरक कालव्याद्वारे ४ दिवस व घोड शाखा कालव्याद्वारे १२ ते १५ दिवस असे पाणी सोडण्याचे नियोजन आहे.या कालव्यांद्वारे दि. ५ मार्च रोजी, घोड शाखा कालव्याद्वारे १४ मार्च रोजी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. मात्र, पाण्याची मागणी लक्षात घेऊन लवकरात लवकर पाणी सोडण्याबाबतही नियोजन सुरू आहे. पिंपळगाव जोगा धरणातून उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर पाण्याचे रोटेशन पूर्ण करण्यासाठी एप्रिल २०१९मध्ये या धरणातील मृत साठ्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन उन्हाळ्यातील हे शेवटचे आवर्तन असेल. या उन्हाळी आवर्तनाचा लाभ पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यांना होणार आहे, अशी माहिती कानडे व गळगे यांनी दिली.दरम्यान, यापूर्वी कालवा समितीची बैठक रद्द झाल्याने आवर्तन सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र, आज झालेल्या बैठकीत पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.>सध्या धरणातील उपलब्ध साठा असासध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढीलप्रमाणे- जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमध्ये आजमितीस ७,६४८ द.ल.घ.फू. (२५.०५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी आजमितीला याच धरणांमध्ये १७,२३३ द.ल.घ.फू. (५४.४३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.सद्य:स्थितीला येडगाव धरणात ९२० द.ल.घ.फू. (४७.३३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. माणिकडोह धरणात ११९९ द.ल.घ.फू. (११.७८ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. वडज धरणात २५१ द.ल.घ.फू. (२१.५० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.पिंपळगाव जोगा धरणात ८५७ द.ल.घ.फू. (२२.०४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. चिल्हेवाडी धरणात १,७५० द.ल.घ.फू. (२०.१७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. तर, आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात ४,४१९ द.ल.घ.फू. (३५.३७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.