शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जलसाक्षरता केंद्र महत्त्वाचे ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:37 IST

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेला उत्साह चिरकाल टिकविण्यासाठी शासनाकडून जलसाक्षरता केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त व जलयुक्त बनविण्यामध्ये या केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेला उत्साह चिरकाल टिकविण्यासाठी शासनाकडून जलसाक्षरता केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त व जलयुक्त बनविण्यामध्ये या केंद्राची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.यशदा येथे सुरु करण्यात आलेल्या जलसाक्षरता केंद्राचा शुभारंभ रविवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या वेळी जलबिरादरीचे प्रणेते राजेंद्रसिंह, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, सामाजिक कार्यकर्ते पोपट पवार, यशदाचे संचालक आनंद लिमये आदी उपस्थित होते.जलसाक्षरता केंद्र्राच्या माध्यमातून नेमलेले साडेसात हजार स्वयंसेवक आपल्या भागातील पाण्याचा वापर, पीकपद्धती, नियोजन यावर लक्ष ठेवतील. जल अभियानातून निर्माण झालेले काम संस्थात्मक पातळीवर सुरु ठेवण्याचे काम जलसाक्षरता केंद्र करेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.गिरीश महाजन म्हणाले, जलसाक्षरता योजनेसाठी २८ कोटी ३० लाख रुपये मंजूर केले आहेत. शेतकºयांना न्याय द्यायचा असेल तर त्याला पाणी आणि वीज द्यावी लागेल. यापुढील काळात ठिबक सिंचनाचा अवलंब केला जाणार आहे.विजय शिवतारे म्हणाले, पाण्याची उपयोगिता वाढविण्यावर भर दिला जात आहे. शहरातल्या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. पुस्तकामध्ये जलसाक्षरता मोहिमेचा समावेश केला पाहिजे.यशदा येथील जलसाक्षरता केंद्र हे मुख्यालय असेल, विभागीय पातळीवर त्याची कार्यालये स्थापन करण्यात येतील. या कार्यालयांच्या माध्यमातून जलसाक्षरता जागृतीचे काम केले जाईल.राजेंद्रसिंहांकडे जलकुंभ सुपूर्तपाच खोºयातील नद्यांचे आणलेले पाणी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते एका जलकुंभात एकत्र करण्यात आले. हा जलकुंभ मुख्यमंत्र्यांनी जलपुरुष राजेंद्रसिंह यांच्याकडे सुपूर्त केला. राजेंद्रसिंह मंगळवारपासून जल संरक्षणाच्या प्रबोधनासाठी ‘चंद्रभागा नमामि’ ही यात्रा करणार आहेत. या यात्रेमध्ये हा जलकुंभ घेऊन ते फिरणार आहेत.जनतेची दुष्काळ व पुरापासून सुटका झाल्यानंतर खºया अर्थाने स्वातंत्र मिळाले असे म्हणता येईल. राज्यातील ४ वेगवेगळ्या प्रकारच्या जलसाक्षरता राबविल्या जाणे आवश्यक आहे. पर्जन्यचक्र व राज्यातील पीक पद्धती यामध्ये समन्वय निर्माण झाला पाहिजे. राज्याला पाणीदार बनविण्याची मोहीम सुरू होत आहे. छोट्या नद्यांना प्रवाहित करण्याचे काम दुसºया टप्प्यात हाती घेतले जावे.- राजेंद्रसिंह, जलतज्ज्ञ