शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या मशीनमधील रकमेचा अपहार? सहा महिन्यांचे पैसे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 03:21 IST

लोहगावमधील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतकाळात पाण्याचे स्वयंचलित मशीन बसवण्यात आले आहे.

विश्रांतवाडी - लोहगावमधील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतकाळात पाण्याचे स्वयंचलित मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनमध्ये ५ रुपयांचे नाणे टाकल्यास ग्राहकाला म्हणजे नागरिकांना एका वेळी २० लिटर पिण्याचे पाणी मिळते. मात्र लोहगावचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर मागील सुमारे ६ महिन्यांच्या कालावधीत या मशीनमध्ये जमा झालेली लाखोंच्या घरातील रक्कम पालिकेकडे जमा झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम नेमकी गेली कुठे, असा सवाल नागरिक करू लागले आहेत.लोहगावमधील पाण्याच्या टाकीबाहेर ही मशीन बसवण्यात आली आहे. लोहगावात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शेकडो नागरिक मशीनमध्ये पैसे टाकून पाणी भरून घेतात. यातून मशीनमध्ये दररोज ४-५ हजार रुपये जमा होतात. ग्रामपंचायतकाळात मशीनमध्ये जमा झालेले पैसे जमा करून हिशोब ठेवला जात होता. मात्र, लोहगाव पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतचे दफ्तर पालिकेकडे जमा करण्यात आले. तसेच पाण्याच्या मशीनमध्ये जमा होणाऱ्या रकमेचा हिशोब ठेवणेही बंद झाले. त्यानंतर मशीनमध्ये जमा होणारी रक्कम पालिकेकडे जमा होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. ही रक्कम जाते कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.नियंत्रण कोणाचे ?मागील ६ महिन्यांच्या काळात मशीनमध्ये जमा होणाºया पैशांचा हिशोब पाहता ही रक्कम ५ ते ६ लाख रुपये इतकी होते. ही रक्कम जमा करण्यापासून तिचा हिशेब ठेवण्याचे काम महापालिकेकडून होणे अपेक्षित होते. मात्र यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने या रकमेचा वापर करून भलतेच आपले उखळ पांढरे करून घेत असल्याची चर्चा आहे. याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयाचीयाबाबत पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता दत्तात्रय तांबारे म्हणाले, पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट गावांचे दफतर जमा करून त्या गावांमधील सर्व यंत्रणांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांची आहे, तसे आदेशच आयुक्तांनी काढले आहेत. त्यामुळे लोहगावमधील पाण्याच्या स्वयंचलित यंत्रामध्ये जमा होणाºया पैशांचा हिशोब नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाने ठेवणे अपेक्षित आहे. तर याबाबत नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त वसंत पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या