शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

विश्रांतवाडीत जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया; नागरिकांनी व्यक्त केला संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 20:44 IST

पुणे शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या बाबतीत महापालिका व जलसंपदा विभागात वाद सुरू आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. ..

पुणे (विश्रांतवाडी) : येथील विमानतळ रस्त्यावर कस्तुरबा सोसायटीसमोर दुरुस्तीसाठी खोललेल्या जलवाहिनीतून हजारो-लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचा्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले.     पुणे शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या बाबतीत महापालिका व जलसंपदा विभागात वाद सुरू आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. अशातच ऐन उन्हाळच्या तोंडावर दुरुस्तीच्या नावाखाली पालिकेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवले जात आहे. यामुळे एकप्रकारे पालिकेकडून पुन्हा एकदा भोंगळ कारभाराचे उदाहरण समोर आले आहे. राष्ट्रवादीचे विनोद पवार म्हणाले, की विश्रांतवाडीत विमानतळ रस्ता परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याबाबत आपण पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या जलवाहिनीत अडकलेला कचरा काढण्यासाठी ही जलवाहिनी खोलण्यात आली. जलवाहिनी खोलण्यापूर्वी पाणीपुरवठा बंद करण्याची विनंती आपण अधिकाऱ्यांना केली होती. मात्र तसे न झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. या गळतीबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी असता, त्यांच्याकडून उलटसुलट उत्तरे देण्यात आली. तसेच जलवाहिनी दुरुस्त करणारे कर्मचारी अनुभवी नव्हते, त्यामुळे हा प्रकार घडला.   पालिकेचे शाखा अभियंता बुद्धप्रकाश वाघमारे म्हणाले, सकाळी साडेसातपासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यावेळी पाणीपुरवठा बंद होता. मात्र दुपारपर्यंत नियोजित वेळेत दुरुस्ती पूर्ण झाली नाही. पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी नागरिक चौकशी करू लागल्याने दुपारी तीननंतर पाणीपुरवठा सुरू करावा लागल्याने पाण्याची गळती झाली. ही गळती रात्रीपर्यंत थांबवण्यात येईल.

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका