शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

वेस्ट टू एनर्जीतून वीजनिर्मिती, शहरातील कचराकोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:18 IST

पिंपरी-चिंचवडमधील कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची दखल मंत्रालयातून घेतली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील कचरा कोंडीमुळे बिघडलेल्या आरोग्याची दखल मंत्रालयातून घेतली आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प महत्त्वाचा आहे. देशातील प्रमुख महापालिकांत हा प्रकल्प राबविला जात आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी हा महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातून निर्माण होणारी वीज पालिका विकत घेणार असून, शहराच्या आरोग्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचा दावा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्याचा घाट घातला जात आहे. मागील महिन्यातील सर्वसाधारण सभेत काळ्या यादीतील ठेकेदाराला काम दिल्याचा आरोप शिवसेनेचे सदस्य नीलेश बारणे यांनी केला होता. याचे आयुक्तांनी खंडन केले आहे.दरम्यान, हा प्रकल्प राबविल्यामुळे मोशीकरांना दुर्गंधीला सामोरे जावे लागणार आहे. कचरा जिथे निर्माण होतो. तिथेच जिरविण्यात यावा अशी मागणी करत शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोशीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्यास विरोध दर्शविला होता.मात्र, पारदर्शक कारभाराचे गाजर दाखवून सत्ताधारी आणि प्रशासन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबविण्याचा घाट घालत आहे. कामाची निविदा पूर्णपणे पारदर्शकपणे काढली आहे. निविदेसाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती, असे सांगत आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘सहाशे टन कचºयापासून आठ मेगावॉट वीज निर्माण होईल. ती वीज पालिकाच खरेदी करणार आहे. हा प्रकल्प दिल्लीत प्रथम सुरू झाला. जबलपूर, सुरतमध्ये तो सुरू आहे.’’>आयुक्तांचा पारदर्शकतेचा दावाआरोग्याचे तीन तेरा वाजले असताना वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामाच्या निविदा पारदर्शकपणे काढण्यात आल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. हर्डीकर म्हणाले, ‘‘ओल्या कचºयाचा वास येतो. त्यामुळे नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे गरजेचे आहे. ओला कचरा मोशी डेपोवर आला नाही तर दुर्गंधीचा त्रास होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी ओला कचरा जिथे तयार होतो. तिथेच जिरविला पाहिजे. तसेच बांधकामाचा कचरा, इतर राडारोडा वेगळ्या पद्धतीने गोळा करण्यात येणार आहे. शहरात कचºयाची समस्या आहे. परंतु, त्यासाठी लागणारे मनुष्यबळदेखील उपलब्ध नाही. तरीही आम्ही दररोज कचरा उचलला जावा, यासाठी प्रयत्न करत आहोत. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामाच्या निविदा पारदर्शकपणे काढण्यात येणार आहे. कोणी काय आरोप केला याबाबत मी बोलणार नाही. माहिती चुकीची आहे.’’

टॅग्स :Puneपुणे