पिंपरी सांडस : पिंपरी सांडस येथील वन विभागाच्या हद्दीतील गट क्र. ४९३ मधील १९ हेक्टर क्षेत्र हे पुणे महानगरपालिका कचरा डेपोसाठी देण्याची शक्यता पाहता पिंपरी सांडस आणि पूर्व हवेलीतील १८ गावांनी एकत्र येवून तीव्र विरोध केला. कचरा डेपा होवू देणार नाहीच, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. अष्टापूर फाटा येथे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले होते. पुणे महानगरपालिकेचा कचरा ग्रामीण भागातील पिंपरी सांडस, पेरणे, डोंगरगाव, बुर्केगाव, न्हावी सांडस, सांगवी सांडस, हिंगणगाव, अष्टापूर, शिंदेवाडी, भिवरी, वाडेबोल्हाई, केसनंद, तुळापूर, वढू, फुलगाव, लोणी कंद या गावांत कोठेही टाकू देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला.अष्टापूरचे माजी सरपंच श्रीहरी कोतवाल यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात कचरा डेपो होऊ देणार नाही. शासनाने तसे न ऐकल्यास जैतापूर प्रकल्पासारखा विरोध करू, असे ठणकावून सांगितले.हवेली पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर वाळके यांनी , महानगरपालिकेने स्वत:च्या कचऱ्याची शहरी भागातच विल्हेवाट लावावी. ग्रामीण भागामध्ये कोठेही कचरा टाकू देणार नाही. शासनाने जबरदस्तीने कचरा डेपो करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन उभारू असा इशारा दिला. पिंपरी सांडस येथील साने गुरुजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान संचालक वाल्मीकराव भोरडे यांनी आमच्यावरती जबरदस्ती केली तर आम्ही त्याच ठिकाणी आत्महत्या करू असे सांगितले. ही जागा पिंपरी सांडस हद्दीतील असून, कचरा डेपोसाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने दिलेले नाही अथवा देणारही नाही, असे पिंपरी सांडसचे उपसरपंच दत्तात्रय सातव यांनी सांगितले.या वेळी ज्ञानेश्वर ठोंबरे, विजय पायगुडे, सुभाष कोतवाल, भाऊसाहेब शिंदे, योगेश शितोळे, नवनाथ येनभर आदी अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संपत मोरडे, नितीन बाजारे, माजी उपसरपंच शंकर माडे, शंकर भोरडे, बाळासाहेब भोरडे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ श्ािंगटे, प्रकाश जमादार, रामभाऊ ठोंबरे, अनिल काळे, सतीश भोरडे, संभाजी भोरडे, विकास कोतवाल, रामभाऊ शितोळे, दत्तात्रय गजरे, दीपक लोणारी, राजेंद्र बोडके, अण्णासाहेब कोतवाल, राहुल कोतवाल, विजय पायगुडे, संतोष सूर्यवंशी, संजय पायगुडे, रामचंद्र पायगुडे, राजेंद्र गुंड, गणेश बाजारे आदी मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)४या वनीकरणाच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिंब, बोरी, माल, चंदन, बाभूळ अशी अनेक प्रकारची झाडे असून, त्यांची पूर्ण वाढ झाली आहे. ती नष्ट करून कचरा डेपो होणार असेल, तर परिसरातील ग्रामस्थांचा याला विरोधच आहे. ४या वनक्षेत्रालगतच वाडेबोल्हाई मातेचे मंदिर असून, हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी राज्यातील विविध भागांतून लोक दर्शनासाठी येतात. त्यामुळे धार्मिक स्थळांवर देखील दुष्परिणाम होऊ शकतो. ४लोहगाव येथील विमानतळ सरळ रेषेत पाहिले असता सात किलोमीटर अंतर होऊ शकते. त्यामुळे कचरा डेपोमुळे विमान अपघाताला धोका होऊ शकतो.पाणी दूषित होणारही जागा उंचावर असून, बाजूचा परिसर खोलगट असल्याने प्रथम पाणी दूषित होणार आहे. शिवाय बाजूला ब्रिटिशकालीन तलाव असून, त्या पाण्याचा उपयोग जनावरांना पिण्यासाठी केला जातो. वन विभागाच्या खर्चाने पाणी साठविण्यासाठी आतापर्यंत चार बंधारे बांधले असून, त्याचा उपयोगही पाण्यासाठी केला जातो.शिवाय बाजूलाच पिण्याच्या पाण्याची विहीर असून, त्या विहिरीचा उपयोग पाणी पिण्यासाठी केला जातो. हे सर्व असूनसुद्धा या जागेवर कचरा डेपो झाल्यास या सर्व गोष्टी नष्ट होतील, याचा विचार शासनाने करावा.रविवारी बैठकरविवारी (दि. ११) कचरा डेपोला विरोध करण्यासाठी वाडेबोल्हाई मंदिरामध्ये दुपारी ३ वाजता पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, अनेक मान्यवर मंडळी लोकप्रतिनिधी या बैठकीला हजर राहणार आहेत.
कचरा डेपो होऊ देणार नाही
By admin | Updated: January 8, 2015 22:58 IST