शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
2
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
3
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
4
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
5
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
6
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
7
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
8
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
9
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
10
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
11
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
12
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
13
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
14
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
15
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
16
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
17
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
18
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
19
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
20
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?

‘ते’ तीन महिने ठरले उच्चांकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:08 IST

कोरोनाचे नऊ महिने लोकमत न्युज नेटवर्क पुणे : राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर सर्वत्र घबराट पसरली. त्यानंतर दिवसागणिक ...

कोरोनाचे नऊ महिने

लोकमत न्युज नेटवर्क

पुणे : राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळल्यानंतर सर्वत्र घबराट पसरली. त्यानंतर दिवसागणिक नवीन रुग्ण व मृत्युचा आकडा वाढतच गेला. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे तीन महिने पुण्याच्यादृष्टीने काळजीचे ठरले. या तीन महिन्यातच दररोज दीड हजाराच्या सरासरीने जवळपास सव्वा लाख नवीन रुग्ण आढळले. तर कोरोनाने या कालावधीतच तब्बल तीन हजार जणांचा बळी घेतला. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर खाट मिळणेही कठीण झाले होते. ऑक्टोबर महिन्यापासून मात्र पुणेकरांना दिलासा मिळत गेला.

चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासूनच पुण्यात नायडू रुग्णालयामध्ये परदेशी प्रवाशांच्या तपासणीची सोय करण्यात आली. दि. ८ मार्च पर्यंत झालेल्या सुमारे १०० जणांच्या तपासण्यांमध्ये एकही प्रवासी बाधित आढळून आला नाही. राज्यातही हीच स्थिती होती. पण दि. ९ मार्च रोजी होळीच्या दिवशी सायंकाळी दुबईतून आलेल्या पती-पत्नीला कोरोनाचा विळखा पडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणु संस्थेने (एनआयव्ही) दिला. हे दोघे महाराष्ट्रातील पहिले कोरोनाबाधित ठरले. त्या रात्रीपासून पुणेकरांची अक्षरश: झोप उडाली. आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन सतर्क झाली. दोघे राहत असलेल्या सोसायटीसह जवळच्या परिसरात जणु आणीबाणीची परिस्थती निर्माण झाली होती.

त्यानंतर २० मार्चला कोणत्याही परदेश प्रवासाची पार्श्वभूमी नसलेली ४१ वर्षीय अंगणवाडी सेविका बाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे संपुर्ण आरोग्य यंत्रणा हादरून गेली. ही सामुहिक संसर्गाची सुरूवात झाल्याची भिती व्यक्त होऊ लागली. त्यानंतर पुढील महिनाभरात पुण्यात १८२ बाधित रुग्ण आढळले. भवानी पेठ, गंज पेठ, रास्ता पेठ, कसबा पेठ यांसह शहराच्या अन्य काही भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत गेली. जुलै महिन्यापासून ही वाढ हाताबाहेर जाऊ लागली. पुढील तीन महिने कोरोनाने शहरात जणू धुमाकुळ घातला. ऑक्टोबरनंतर यात सुधारणा होत गेली.

-----------------

मागील नऊ महिन्यांतील स्थिती

दिवस एकुण चाचण्या एकुण बाधित एकुण मृत्यू बरे झालेले

९ मार्च ११२ ०२ ०० ००

९ एप्रिल १,८१५ १८२ २१ ६२

९ मे २१,८१३ २,३८० १४० ८२६

९ जुन ६२,४९५ ८,२०५ ४०३ ५,३०४

९ जुलै १,५०,६२८ २५,१७४ ७८६ १५,५७९

९ ऑगस्ट ३,१९,५८८ ६५,९६६ १,५४० ४८,६१४

९ सप्टेंबर ५,०७,८६६ १,११,९१६ २,६२५ ९२,६१४

९ ऑक्टोबर ६,६८,९३१ १,५२,८९७ ३,७८६ १,३५,३७५

९ नोव्हेंबर ७,५६,४९४ १,६३,४३४ ४,३४८ १,५४,१२८

८ डिसेंबर

----------------------------------------------------------------------