शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

समलैंगिक संबंधाची मागणी करणाऱ्यावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:18 IST

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाकडे समलैंगिक संबंधाची मागणी करणा-या २४ वर्षांच्या तरुणावर चौघांनी त्याच्याकडील चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला़

पुणे : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाकडे समलैंगिक संबंधाची मागणी करणा-या २४ वर्षांच्या तरुणावर चौघांनी त्याच्याकडील चाकूने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला़ ही घटना टिळक रोडवरील गिरिजा हॉटेलजवळील एका पडक्या इमारतीत रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली़ या प्रकरणी पळून जाणाºया तिघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले असून एक जण फसार झाला आहे़दिनेश ऊर्फ गण्या सुरेश कांबळे (वय २४, रा़ मंडई) असे जखमी झालेल्याचे नाव आहे़ या प्रकरणी खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून मयूर मोतीराम राठोड (वय १८, रा़ लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक केली आहे़ दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे़या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कांबळे हा फिरस्ता असून त्याची आणि राठोड व इतर दोन अल्पवयीन मुलांची ओळख होती़ रविवारी दुपारी दिनेश याने या चौघांना येरवड्याहून घेऊन टिळक रोडवरील एका पडक्या इमारतीत आला़ त्याने हॉटेलमधून नास्ता आणून सर्वांना दिला़ त्यानंतर इतर तिघांना खालच्या मजल्यावर थांबवून एकाला वरच्या मजल्यावर नेले़ तेथे त्याने त्याच्याकडे समलैंगिक संबंधाची मागणी केली़ त्या अल्पवयीन मुलाने त्याला नकार दिल्यावर दिनेश याने त्याला चाकूचा धाक दाखवून मारून टाकण्याची धमकी दिली़ त्याने आरडाओरडा केल्याने त्याचा आवाज ऐकून खालच्या मजल्यावरील तिघे धावत वर आले़ त्या गडबडीत त्या मुलाने दिनेशच्या हातातील चाकू हिसकावून घेऊन त्याच्यावर वार केले़ दिनेश आरडाओरडा करू लागल्याने रस्त्यावरून जाणाºया साध्या वेशातील पोलीस कर्मचाºयाने पळून जाणाºया चौघांपैकी तिघांना नागरिकांच्या मदतीने पकडून ठेवले़ दिनेशवरही अनैसर्गिक कृत्य कलम ३७७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.>वेळेवर उपचारटिळक रोडवरील एका पडक्या इमारतीच्या दुसºया मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात दिनेशला नागरिकांनी वेळेवर मदत करून ससून रुग्णालयात पोहचविल्याने त्याचे प्राण वाचू शकले़ याबाबत जनहितम संघटनेचे अध्यक्ष रामविलास माहेश्वरी यांनी सांगितले की, आपण कुटुंबाबरोबर येथील हॉटेलमध्ये आलो होतो़ आवाज एकून रोड ओलांडून तिकडे धाव घेतली तेव्हा तेथून जाणारे पोलीस कर्मचारी अमित पवार यांनी पळून जात असलेल्यांना पकडले़ वर जाऊन पाहिले तर एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता़ लोकांना बोलावून त्याला खाली आणले़ त्यानंतर रिक्षातून नेण्याचा प्रयत्न केला पण तो रिक्षात आडवा बसू शकत नसल्याने १०८ नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून त्याला घेऊन ससूनमध्ये नेले़>म्हणून कचºयावरकर घेण्याचा प्रस्तावसध्या घनकचरा व्यवस्थापन विभागाला दर वर्षी मिळणारे उत्पन्न अत्यंत नगण्य आहे. गेल्या चार अर्थिक वर्षांतील मिळणारे उत्पन्न व होणारा खर्च याचा विचार केला असता दर वर्षी सरासरी २२० ते २८० कोटी रुपयांचा तोटा महापालिकेला सहन करावा लागत आहे. शासनाच्या नवीन घनकचरा व्यवस्थापन कायद्याला २०१६ नुसार कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी येणारा खर्च शहरातील नागरिकांकडून ‘वापरकर्ता शुल्क’ (युजर चार्जेस) आकारणे बंधनकारक केले आहे. या कायद्यानुसार व खर्च आणि उत्पन्नाताली तुट भरून काढण्यासाठी ‘कचºयावर कर’ घेण्याचा प्रस्ताव आहे.-ज्ञानेश्वर मोळक,घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख>कचºयावर करभाजपाचे अपयशपुणेकरांना नवीन वर्षात कचºयावर कर द्यावा लागणार हे सत्ताधारी भाजपाच्या कामाचे अपयश आहे. सध्या उपलब्ध असलेले स्रोत वापरून चांगली सेवा देण्याऐवजी केवळ काही तरी करतो हे दाखविण्यासाठी पुणेकरांच्या खिशावर डल्ला टाकण्याचा प्रकार आहे. २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेला मंजुरी घेतली. परंतु त्यानंतर हा खर्च करण्यासाठी कर्ज काढून महापालिकेला कर्जबाजारी केले व पुणेकरांच्या पाणीपट्टीत दर वर्षी दहा टक्के वाढदेखील. परंतु दोन वर्षे झाले योजनेचे काम सुरू झाले नाही. हीच स्थिती कचºयावर कर लावून सत्ताधारी भाजपा करणार आहे.- अरविंद शिंदे, काँगे्रस गटनेते