कात्रज : प्रभाग क्रमांक ३८ चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रकाश कदम, दत्तात्रय धनकवडे, मनीषा गणेश मोहिते व वैशाली शिवाजी खुटवड यांनी पूर्ण प्रभाग पिंजून काढला असून मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे.सुखसागरनगर, अंबामाता चौक, राजीव गांधीनगर, चैत्रबन, बालाजीनगर, गुजरवाडी, भारतनगर, दत्तनगर, वरघडेनगर, शेलारमळा या भागात नागरिकांनी या चारही उमेदवारांना समर्थन दर्शवत त्यांचे स्वागत केले. नव्याने प्रभाग क्रमांक ३८ मध्ये जोडण्यात आलेल्या राजीव गांधीनगर भागात बोलत असताना उमेदवारांनी सांगितले, की या भागातील नागरिक मागील अनेक वर्षांपासून विकासासाठी झगडत आहेत. खोटी-आश्वासने दाखवून येथील युवकांना भरकटवण्याचे प्रयत्न केले गेले. पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन, भूमिगत विजेच्या तारा, मोठ्या ड्रेनेजलाईन, सिमेंटचे रस्ते, प्रत्येकाला हक्काची पक्की घरे हे प्रश्न तातडीने सोडवू. रखडलेल्या विकासमुळे येथील तरुण बेरोजगार झाले आहेत, येथील प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देण्याचा आमचा प्रयत्न राहील. या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून भ्रष्टाचारमुक्त करू, असे आश्वासन या वेळी देण्यात आले.पदयात्रेला सुरेश कदम, गणेश मोहिते, अनिल ढवण, जीतू चव्हाण, नारायण निंबाळकर, रमेश सोनकांबळे, दत्ता पवार, मिलिंद पन्हाळकर, शिवाजी खुटवड, अर्जुन निंबाळकर, विजय पवार, नवनाथ गुजर, गणपत गुजर, नीलेश गुरव, संजय खोपडे, सुधीर डावखर, नितीन रणसिंग, विठ्ठल वरुडे, श्रीकांत जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)
राष्ट्रवादीची प्रभाग ३८ मध्ये पदयात्रा
By admin | Updated: February 15, 2017 02:21 IST