शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

गणवेशासाठी महिनाभराची प्रतीक्षा, विलंबाने वाटपाची परंपरा यंदाही कायम राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 02:01 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. गणवेशवाटपाची प्रक्रिया अजूनही निविदा पातळीवरच असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने विद्यार्थ्यांना नवे गणवेश मिळणार आहेत. तोपर्यंत जुन्या गणवेशावरच विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार आहे.

बारामती - शाळेच्या पहिल्या दिवशी नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश न मिळण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. गणवेशवाटपाची प्रक्रिया अजूनही निविदा पातळीवरच असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने विद्यार्थ्यांना नवे गणवेश मिळणार आहेत. तोपर्यंत जुन्या गणवेशावरच विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागणार आहे.बारामती नगरपालिकेच्या नऊ मराठी, तर एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळांमधून १ हजार ९६१ विद्यार्थी यंदा शिक्षण घेणार आहेत. नगरपालिकेच्यावतीने दरवर्षी विद्यार्थ्यांना दोन गणवेश, पायमोजे, दप्तर, बूट यांचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी या वस्तू शाळेमार्फत विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.मात्र, नगरपालिका प्रशासनाने यंदाही या वस्तूंच्या वाटपातील दिरंगाई कायम ठेवली आहे. या वस्तू खरेदी करण्याबाबतची निविदा प्रक्रिया नुकतीच मंजूर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळण्याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नसल्याचे नगरपालिका अधिकाऱ्यांकडूनच स्पष्ट करण्यात आले.मागील वर्षीही विद्यार्थ्यांना वेळेत गणवेशाचे वाटप झाले नव्हते. विद्यार्थीसंख्या सुमारे २ हजार असतानाही प्रशासनाकडूनवस्तूंच्या खरेदी प्रक्रियेत दिरंगाई केली जाते.सर्व शाळा दि. १५ जून रोजी सुरू होणार असल्याचे आधीपासूनच जगजाहीर आहे. तरीही पालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणा केला गेला. वेळेत गणवेश मिळत देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.पहिल्या दिवशी पुस्तके नाहीचशैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता पहिली, आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके मिळणार आहेत. शासकीय व अनुदानित शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत ही पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना मिळतील, असे बालभारतीचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी जाहीर केले होते. मात्र, बारामती नगरपालिकेच्या शाळांना अद्यापही ही पुस्तके मिळाली नाही. ‘पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध पुस्तके देण्यात येणार आहेत. मात्र अभ्यासक्रम बदललेल्या इयत्तांची पुस्तके अद्याप मिळाली नाहीत’, असे नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी महेश पवार यांनी सागितले.शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे होणार स्वागततालुक्यातील २७९ जिल्हा परिषद शाळांमधील ३८ हजार ९२३ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी १ लाख २१ हजार ८६१ पुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर पवार यांनी सांगितले. तालुक्यातील शाळांच्या खात्यावर गणवेशासाठी ४५ लाख १५ हजार रुपये शिक्षण विभागाच्यावतीने जमा करण्यात आले आहेत. मात्र, गणवेश खरेदीच्या पावत्या शाळेकडे जमा केल्यानंतर गणवेशांची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांना खात्यावर जमा करण्यात येते. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्येदेखील पहिल्या दिवशी विद्यार्थी गणवेशात दिसणार का? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तर शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत. त्याप्रमाणे गावातील पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी शाळांमध्ये स्वागत करण्यात येणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रPuneपुणे