शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘टेक आॅफ’ची प्रतीक्षा

By admin | Updated: April 30, 2015 23:54 IST

पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार, याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे.

पुणे : गेल्या पंधरा वर्षांपासून केवळ चर्चेचा विषय ठरलेला व पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे चाकण आंतरराष्ट्रीय विमानतळ नक्की केव्हा ‘टेक आॅफ’ घेणार, याबाबत सध्यातरी सर्वच स्तरांवर संदिग्धताच आहे. शासनाने पुणे शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर तरी पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. १९९७ ला हे विमानतळ राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पुण्यातील लष्करी तळाला त्याचा अडथळा येत असल्याने शासनाने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर खेड तालुक्यातच चाकणच्या उत्तरेस पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या शिरोली-चांदूस परिसरात विमानतळासाठी जागेचा सर्व्हे करण्यात आला. या जागेला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला, तसेच येथील डोंगराळ जागा विमानतळासाठी तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचा अभिप्राय एमएडीसी (महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी) दिला. त्यामुळे विमानतळासाठी पुन्हा नव्याने जागेचा शोध सुरु झाला आणि कडूस-पाईट येथे विमानतळ करता येईल का, याबाबत विचार सुरू झाला. ही जागा विमानतळासाठी योग्य असल्याचा अभिप्राय तांत्रिक समितीने दिला आहे. परंतु येथेदेखील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने राजगुरुनगरच्या पूर्वेस ‘सेझ’च्या जागेत विमानतळ करता येईल, असा प्रस्ताव पुढे आला आहे. परंतु याबाबत देखील गेले दोन वर्षे काहीच निर्णय होऊ शकला नाही. त्यात राज्य शासनाने सेझसाठी संपादित करण्यात आलेली जमीन शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ही जमीनदेखील विमानतळासाठी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे भाजप सरकारच्या काळात पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)४शासनाने पुणे आणि लगतच्या जिल्ह्यातील औद्योगिक व कृषी विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे १९९७ ला हे विमानतळ राजगुरुनगरपासून १२ किलोमीटर दक्षिणेस असलेल्या चाकण येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला.