शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळासाठी संरक्षण विभागाच्या परवानगीची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 06:59 IST

संरक्षण विभागाने उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्यांना समर्पक उत्तरे देऊनही पुरंदर विमानतळासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही.

पुणे : संरक्षण विभागाने उपस्थित केलेल्या तांत्रिक मुद्यांना समर्पक उत्तरे देऊनही पुरंदर विमानतळासाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. पुरंदरच्या नियोजित विमानतळावरून होणाºया उड्डाणांमुळे हवाई दलाच्या विमानांना अडचण येणार नाही, गंभीर परिस्थितीमध्ये या विमानतळावरील नागरी आणि व्यावसायिक उड्डाणे रद्द केली जातील. तसेच देशाच्या सुरक्षेबरोबरच नागरी सोयी-सुविधा आणि विकास महत्वाचा असून पुण्याचे भौगोलिक व व्यावसायिक महत्व लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण विमानतळ प्राधिकरणाने संरक्षण विभागाला दिले होते.पुरंदरला विमानतळ झाल्यास लोहगाव विमानतळावरून लष्कराच्या विमानांच्या उड्डाणांमध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच पुरंदरवरून होणारी नागरी उड्डाणे आणि लोहगाववरून होणारी लष्करी विमानांची उड्डाणे यामध्ये ताळमेळ साधणे जिकिरीचे जाणार आहे. मुंबईमधील भाभा अणुसंशोधन केंद्रासह मुंबई व मुंबईच्या बंदरांची सुरक्षाव्यवस्था हवाई दलाकडे आहे. देशाच्या सीमेवर असलेला तणाव लक्षात घेता हवाई दलाची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे, अशी कारणे संरक्षण विभागाने आक्षेपामध्ये दिली होती. या आक्षेपाला उत्तर देताना, ‘लोहगावहून दिवसाला ८० विमानांचे उड्डाण होत असून तेवढीच विमाने येथे उतरतात. त्यामध्ये हवाई दलाची केवळ सहा विमाने असतात. पुरंदरचे नियोजित विमानतळ लोहगावपासून ४० किलोमीटर लांब आहे. सीमेवर गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास मुंबई, नवी मुंबईसोबतच पुरंदर विमानतळावरील नागरी आणि व्यावसायिक उड्डाणे रद्द केली जातील, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.लोहगाव येथून होत असलेल्या नागरी, व्यावसायिक व हवाई दलाच्या विमानांचे उड्डाण होत आहे. हवाई दलाच्या उड्डाणांना कसल्याही प्रकारचा अडथळा येत नाही. मग ४० किलोमीटर दूर असलेल्या पुरंदरवरून संभाव्य उड्डाण होणाºया विमानांचा अडथळा कसा होईल, असा प्रश्नही उपस्थित केला होता. दरम्यान, पाच जुलै रोजी संरक्षण विभाग, विमानतळ प्राधिकरण, जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाºयांची संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी बैठक घेतली होती. भाभा अणुसंशोधन केंद्राकडून इशारा दिला गेल्यास हवाई दलाची विमाने लोहगाव विमानतळावरून उड्डाण करून नवी मुंबईतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कक्षेमधून जातील. असे असताना त्या विमानतळाला कोणताही आक्षेप घेण्यात आलेला नसल्याचे या बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले होते. या बैठकीनंतर आॅगस्टमध्ये परवानगी मिळेल,असा अंदाज बांधण्यात येत होता. परंतु, निर्णय अद्याप घेण्यात आला नाही.

टॅग्स :Puneपुणे