शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

खंडाळ्याच्या कुशीतील वाघजाई

By admin | Updated: October 6, 2016 02:40 IST

मुंबई-पुणे प्रवासात बोरघाटातून सह्याद्रीच्या रांगा पार करत लोणावळ्याच्या दिशेने जाताना निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खंडाळा

लोणावळा : मुंबई-पुणे प्रवासात बोरघाटातून सह्याद्रीच्या रांगा पार करत लोणावळ्याच्या दिशेने जाताना निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या व ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खंडाळा गावाच्या घाटमाथ्यावर श्री वाघजाईदेवीचे स्वयंभू व जागृत देवस्थान व देवालय आहे. वाघजाई मातेच्या देवालयास ब्रिटिशकाळापासून महत्त्व प्राप्त आहे. त्या काळी घनदाट अरण्य, खोल दऱ्या, हिंस्र श्वापदे असलेल्या या भागातून प्रवास करणे म्हणजे धाडसच असायचे. परंतु दळणवळणाचा हाच मार्ग असल्याने प्रवास सुखरूप होण्यासाठी आपली उद्दिष्टे सफल होण्यासाठी व्यापारी, सैनिक आणि नागरिक आई वाघजईला साकडे घालून प्रार्थना करून या भागातून प्रवास करीत असत. देवस्थानाची १८६७मध्ये डागडुजी करून देवीला छत्रछाया देऊन मंदिराची उभारणी करण्यात आली. दिवाबत्तीची सोय करण्यासाठी प्रमुख पुजारी म्हणून सख्या हरी कोळी यांची त्या काळी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आबू गणू लांघे, त्यांची मुले नारायण, बबन, कोंडीराम यांनी पुजारी म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. सध्या लांघे कुटुंबीयच पुजाऱ्याचे काम पाहतात. भाविक दर्शन, नवस, साकडे, कौल आदीसाठी येत असतात. मंगळवार व शुक्रवार या देवीच्या दोन्ही वारी भाविकांची गर्दी असते.मंदिर परिसरातील वनराई व निसर्गरम्य परिसर भाविकांच्या मनाला सुखानुभव देऊन जातो. लोणावळ्याचे माजी नगरसेवक (कै.) एम. डी. कचरे पाटील यांनी १९७८मध्ये कार्यकारी मंडळाची स्थापना केली. मंदिराची देखरेख, भाविकांसाठी धर्मशाळा, विद्युतीकरण, पिण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली. सन १९८१मध्ये या ठिकाणी श्री वाघजई देवी मंदिर ट्रस्टची स्थापना केली. (वार्ताहर)