शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाघोली-आव्हाळवाडी- मांजरी रस्ता गेला खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:22 IST

ड्रेनेज पाइपलाइनचे कामही सुरू : अरुंद रस्त्यावरील खड्ड्याने प्रवासी हैराण

आव्हाळवाडी : वाघोली- आव्हाळवाडी-मांजरी खुर्द रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत, की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिले; मात्र तरीदेखील लोकप्रतिनिधी याबाबत गप्प का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे प्रशासकीय अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता ग्रामस्थांनाच रस्त्यावर उतरावे लागणार आहे, असे माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सातव व माजी सरपंच प्रवीण आव्हाळे यांनी सांगितले.

आव्हाळवाडी ते वाघोली रस्त्यावर दोन ते तीन वर्षांपासून खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कामगार आणि वाहनचालक वैतागले आहेत. याच रस्त्यावर दारूचे दुकान आणि हॉटेल, लहान मोठी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे दारूपिऊन गाडी चालविणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. त्यामुळे कायम अपघात घडतात. याबाबत, वाघोली ग्रामपंचायत आणि संबंधित खाते सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आव्हाळवाडी ग्रामपंचायतीने केला आहे. २० जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम सुरु केल्यास २१ जानेवारीपासून रस्ता बंद करून गांधीगिरी मार्गाने आंदोनल करून, या मार्गावरील खड्ड्यांवर वृक्षारोपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.ड्रेनेजचे काम संथगतीने४याच रस्त्यावर वाघोली ग्रामपंचायतीचे ड्रेनेज पाईपलाईनचे काम संथगतीने चालू आहे. त्यामुळे नागिरकांची आणखीपंचाईत होत आहे.४आधीच खराब रस्ता. त्यात पाईपलाईनमुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला खड्डे खोदून त्याची माती रस्त्यावर टाकल्याने रस्ता अधिक अरुंद झाला आहे. त्यामुळे येथे वाहतूक कमी असतानासुद्धा अरुंद रस्त्यामुळे आणि खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होतआहे. 

टॅग्स :Puneपुणे