पुणो : अंधo्रद्धेतून होणारे शोषण, भोंदुगिरी, कर्मकांड या विरोधातील 25 वर्षाचा संघर्ष पूर्ण झाल्यानंतर आता महाराष्ट्र अंधo्रद्धा निमरूलन समिती (अंनिस) व्यसन व मानसिक आरोग्याचे प्रश्न याविरोधात एल्गार उभारणार आहे. अंनिसच्या दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये हे दोन विषय प्राधान्याने असणार आहेत.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होत आहे, गेल्या वर्षभरात अंनिसची चळवळ जोमाने वाढली आहे. या पाश्र्वभूमीवर संघटनेची सध्याची व दीर्घकालीन उद्दिष्टे काय असतील, याविषयी राज्य कार्यवाह अविनाश पाटील व राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार पुढील काही वर्षामध्ये मानसिक आरोग्य व व्यसनांचा प्रश्न खूप गंभीर असणार आहे. पुढील दहा वर्षामध्ये मानसिक आरोग्य, नैराश्य याविरोधात काम केले जाणार असल्याचे मिलिंद देशमुख यांनी सांगितले. अंनिसच्या माध्यमातून पूर्वी करण्यात येत असलेले उपक्रम सुरूच राहतील तसेच यापुढील काळात तरुण-तरुणींना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करून घेण्याचा मानस असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. अंधo्रध्दा निमरूलन समितीच्या कामाला व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेण्याचा निर्धार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी केलेला होता. जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून सलग 18 वष्रे अविरतपणो प्रयत्न करण्यात आले. डॉक्टरांचा खून झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य शासनाने वटहुकूम काढून हा कायदा मंजूर केला. सध्या कायद्याची योग्य पध्दतीने अंमलबजावणी व्हावी याकरिता अंनिसचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
सर्वसामान्य जनतेचं भानामती, करणी काढून देतो तसेच इतर कारणांनी फसवणूक करणा:यांविरुध्द संघर्ष करताना पूर्वी कार्यकत्र्याना
खूप त्रस सहन करावा
लागायचा, पोलिसांची कोणतीही मदत मिळायची नाही. जादूटोणाविरोधी कायदा झाल्यामुळे कार्यकत्र्याना मोठा आधार निर्माण झाला आहे अशी
माहिती अविनाश पाटील यांनी
दिली. (प्रतिनिधी)
रिंगणचे वर्षभरामध्ये 5 हजार प्रयोग
अंनिसचे विचार मांडणारे ‘रिंगण’ नाटय़ दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारत आहे. सध्या 25क् जणांचे 2क् गट याकरिता उभे असून, पुढील काळात आणखी 3क् गट निर्माण करण्यात येणार आहेत. या 5क् गटांकडून वर्षभरामध्ये 5 हजार प्रयोग करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती मिलिंद देशमुख यांनी दिली. रिंगण नाटय़ाच्या माध्यमातून अनेक कलाकार अंनिसला जोडले जात आहेत. या कलाकारांना कार्यकर्तेपण देण्याचे काम अंनिसकडून केले जाणार आहे.