शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

विठ्ठल हे मराठी माणसाच्या मनातील दैवत : माधव भंडारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 12:59 IST

पंढरपुर व विठ्ठल यांच्या नामाचा उल्लेख इसवी सन ५३४  शिलालेखमध्ये उपलब्ध आहे. त्यावेळी पांडुरंग पलवी असे या गावाचे नाव होते.

ठळक मुद्देपंढरपुर व विठ्ठल यांच्या नामाचा उल्लेख इसवी सन ५३४  

 लोणावळा : मराठी माणूस जगाच्या पाठीवर जिथे जिथे गेला तेथे विठ्ठलाला सोबत घेऊन गेला अशा या विठ्ठलाचा महिमा आषाढी एकादशीला पहायला मिळतो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत विठ्ठल नामाला व वारीला अनन्य साधारण महत्व आहे. विठ्ठल हे मराठी माणसाच्या मनातील दैवत असल्याचे मत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.  भांगरवाडी येथील भोंडे हायस्कूलच्या प्रांगणात १६ व्या वसंत व्याख्यानमाला व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ' विठ्ठल एक सनातन कोडे' या विषयावर भंडारी यांनी लोणावळेकरांना मार्गदर्शन केले. यावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, विद्या निकेतन ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव भोंडे, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, वसंत व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष प्रशांत पुराणिक हे उपस्थित होते. भंडारी म्हणाले, किमान नऊशे ते साडेनऊशे वर्षांपासून वारीची परंपरा अखंडपणे सुरु आहे , अशा भक्तिपरंपरेचे हे जगातील एकमेव आश्चर्यकारक उदाहरण आहे. संत ज्ञानेश्वर हे या वैश्विक परंपरेचे आरंभ बिंदू असले तरी त्यांच्या पणजोबांपासून वारीची प्रथा होती. अनेक चढ-उतार व अडचणींवर मात करत ही वारी अखंडपणे आजदेखील सुरू आहे. निमंत्रणाचा मान अपमान नाही, गाजावाजा नाही असे असताना आषाढी एकादशीची तारीख जवळ येताच लाखों वारकरी पंढरीच्या दिशेने पायी चालु लागतात. असा हा वारीचा अगाध महिमा आहे. पंढरपुर व विठ्ठल यांच्या नामाचा उल्लेख इसवी सन ५३४  शिलालेखमध्ये उपलब्ध आहे. त्यावेळी पांडुरंग पलवी असे या गावाचे नाव होते. दोन हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या स्कंदपुराणात प्रथम पंढरपुर व विठ्ठल या नामाचा उल्लेख सापडतो. तर साडेपाच हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या महाभारतात भीमा चंद्रभागेचा उल्लेख सापडतो. श्री विठ्ठल हे एकमेव दैवत आहे की ज्यांच्या हातात कसलेही शस्त्र नाही व त्यांना भक्तांकरीता युध्द देखील करावे लागले नाही. अशा प्रकारे श्री विठ्ठल उलगडून सांगताना  भंडारी यांनी महाभारत, स्कंदपुराण , ज्ञानेश्वरी व अन्य संशोधन साहित्याचा आधार घेत विविध दाखले दिले. 

टॅग्स :lonavalaलोणावळाPandharpurपंढरपूर